Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

महाराष्ट्रातील एक टॉपचा डेअरी फार्म 💯🔥😱 खर्च कमी नफा जास्त | Trisha Dairy Farm

Автор: Indian Farmer Entrepreneurs

Загружено: 2024-01-18

Просмотров: 98726

Описание:

Trisha Dairy Farm in Vidani Tal-Phaltan Dist-Satara
अनिल अभंग
त्रिशा डिअर फार्म (विडणी ता.फलटण,सातारा)
97633 88767
फलटण तालुक्यातील विडणी हे गाव दुधाची पंढरी म्हणून ओळखले जाते. आज विडणी गावात घरटी आपल्याला उत्तम गायी पाहावयास मिळतात. विडणी येथील अनिल अभंग हे उच्च शिक्षित डेअरी फार्मर आहेत.डेअरी फार्मिंगच्या आपल्या स्वतःच्या काही पद्धती त्यांनी तयार केल्या आहेत. त्रिशा डेअरी फार्म हा ब्रँड आता महाराष्ट्रभरात ओळखला जातो याचे कारण आहे अनिल अभंग यांचा अभ्यास आणि अनुभव.🐄🐄
आज महाराष्ट्रातील डेअरी क्षेत्र बदलाच्या वाटेवर आहे. सरकार कडून दराची हमी नसली तरी शेतकरी स्वतः आधुनिक पद्धतीने फार्म सांभाळत चांगल्या गायी तयार करत आहेत. अनिल अभंग यांचा त्रिशा डेअरी फार्म अभंग कुटुंबीयांच्या कष्टातून तसेच अभ्यासातून उदयास आलेला असा हा फार्म आहे. आज २० गाई तसेच ७ कालवडी त्यांच्या फार्मवर आहेत. सकाळी ५ वाजता गाईंची सर्व कामे चालू होतात ते संध्याकाळी ७ पर्यंत हि कामे चालू असतात. अभंग कुटुंबीयांची अडीच एकर शेती आहे यामधील अर्धा एकर वर त्यांनी नेपियर गवत केले आहे तर बाकीचा संपूर्ण चारा हा विकतचा असतो. आपल्या फार्मवरील गायींना बाराही महिना मका पुरवण्याचे काम अनिल अभंग त्यांचे बंधू व वडील करत असतात. आपल्या फार्मचे व्यवस्थापन उत्तम राहिले पाहिजे यावर त्यांचा भर असतो.
त्रिशा फार्म मध्ये प्रामुख्याने गोठ्याची स्वछता ,गायींना स्वछ पाणी, गायींचे आरोग्य,अतिरिक्त खर्चाची बचत,गायीचं रेकॉर्ड मेंटेन अशा पंचसुत्रीवर काम केले जाते.आज अनेक फार्म्स वर मिनरल मिक्स्चर चा वापर होत असताना अनिल अभंग यांनी आता पर्यंत कोणत्याही प्रकारचे मिनरल मिक्चर वापरले नाही आहे तसेच गायी साठी फक्त ते गोळी पेंडेचा वापर करतात. अनिल अभंग यांना याबाबत विचारले असता सांगतात, बाराही महिने मक्याची उपलब्धता करून दिले जाते तसेच क्वचित प्रसंगी मुरघास चा वापर केला जातो. फार्मवरील ९० टक्के गायी या एकाच सीमेन मध्ये गाभण राहतात असा त्यांचा आतापर्यंतचा अनुभव आहे तसेच गायी आजारी पडण्याचे प्रमाण सुद्धा खूप कमी आहे.आपण जर योग्य व्यवस्थापन ठेवले तर नक्कीच आपण एक लिटर दुधाचा खर्च हा वीस रुपये पर्यंत ठेवू शकतो असे ते सांगतात. फार्मवरील गायीला दिवसातून २ वेळेस उत्तम दर्जाचा पोटभरून चारा तसेच २५० ग्रॅम गोळी पेंड लिटर मागे दिली जाते.
अनिल अभंग हे पुढे सांगतात कि त्यांच्या कडे असणाऱ्या गायी या दिवसाला २० लिटर पर्यंत दूध देणाऱ्या आहेत मात्र या दुधात असणारे सातत्य जास्त आहे यामुळे गायीचे दूध हे दिवसाला न मोजता एका वेतात किती आले असे ते मोजतात.डेअरी फार्मवरील रेकॉर्ड ठेवण्यासाठी त्यांनी अभ्यासातून नोंद वही तयार केली आहे. आज त्यांच्या नोंदवहीचा अनेक शेतकरी वापर करत आहेत. अनिल अभंग स्वतः इंजिनिअर असल्याने फार्म मध्ये अनेक नाविन्यपूर्ण गोष्टींचा अवलंब त्यांनी केला आहे.आज फार्मवरील प्रत्येक गायीच्या नोंदी त्यांच्याकडे आहेत याचा फायदा खूप होत आहे असे ते सांगतात.
ऑक्टोबर मध्ये ३.५-८.५ दुधाला असणारा ३५ रुपये दर कमी होऊन ,मागच्या महिन्यात २८ रुपये वर आणला होता. आज घडीला १७५ लिटर रोजचे दूध संकलन फार्ममधून होत आहे.आज जरी सरकारने ५ रुपये अनुदान दिले असले तरी मागील काही महिने नऊ ते दहा रुपये नुकसान सर्व डेअरी फार्मसला सहन करावे लागत होते. अनिल अभंग म्हणतात कि दराचा हा खेळ असाच चालू राहणार यामुळे आपण उत्पादन खर्च कमीत कमी ठेवण्यावर प्रयत्न करावेत.
अनिल अभंग
त्रिशा डिअर फार्म (विडणी ता.फलटण,सातारा)
97633 88767
-अनिकेत घार्गे
Indian Farmer Entrepreneurs

👍 Don't forget to LIKE, SHARE, and SUBSCRIBE for more exciting explorations into the wonders of agriculture! 🌎

🔔 Turn on the notification bell to stay updated on our latest videos!

📣 Connect with us:

Instagram: aniketgharge23
Facebook: Indian Farmer Entrepreneurs

🌟 Thank you for joining us on this Dairy farming adventure! 🌾
#dairy #dairyfarm #dairyfarming #dairyfarminginindia
#dairyfarmingbusiness #dairyfarminginpunjab #dairyfarmingmaharashtra
#hfcow #cowvideos #cowfarm #cowfarmindia
#ifevideos #indianfarmer #indianfarmers #indianfarmerlife
#indianfarmerentrepreneurs #agriculture #farming #agribusiness #agribusinesschannel

महाराष्ट्रातील एक टॉपचा डेअरी फार्म  💯🔥😱 खर्च कमी नफा जास्त | Trisha Dairy Farm

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

मुक्त संचार गायींचा गोठा | hf cow dairy farming | मुर घास | Murgas Chara | Cow Farming | शोध वार्ता

मुक्त संचार गायींचा गोठा | hf cow dairy farming | मुर घास | Murgas Chara | Cow Farming | शोध वार्ता

35 गायींचा गोठा | महिना दीड लाखांचा निव्वळ नफा | कमी खर्चात गोठा नियोजन | Dairy Farming Maharashtra

35 गायींचा गोठा | महिना दीड लाखांचा निव्वळ नफा | कमी खर्चात गोठा नियोजन | Dairy Farming Maharashtra

शानदार गाय खरीदे आरिफ dairy farm Jaipur | jaipur Pashu hatwada | jaipur cow Mandi 10 दिसंबर 2025

शानदार गाय खरीदे आरिफ dairy farm Jaipur | jaipur Pashu hatwada | jaipur cow Mandi 10 दिसंबर 2025

Rajasthan Bakra mandi tonk goat market live update 10,12,2025 || #tonkgoatmarket #tonkbakramandi

Rajasthan Bakra mandi tonk goat market live update 10,12,2025 || #tonkgoatmarket #tonkbakramandi

Y T Patil Dairy Farm Arvind Patil is live

Y T Patil Dairy Farm Arvind Patil is live

52 गाईंतून महिन्याला लाखोंचे उत्पन्न | नोकरी सोबत दूधव्यवसाय करून लखपती होण्यामागचं सीक्रेट?

52 गाईंतून महिन्याला लाखोंचे उत्पन्न | नोकरी सोबत दूधव्यवसाय करून लखपती होण्यामागचं सीक्रेट?

ऊसापेक्षा दुग्ध व्यवसायात जास्त फायदा,योग्य नियोजनाची गरज, बापूसो म्हाळुंगेकर यांची सक्सेस स्टोरी

ऊसापेक्षा दुग्ध व्यवसायात जास्त फायदा,योग्य नियोजनाची गरज, बापूसो म्हाळुंगेकर यांची सक्सेस स्टोरी

१००% विकतच्या चार्‍यावर चालणारं यशस्वी गाईपालन | शुन्यातून सुरुवात करून आता महिन्याला १ लाख नफा!

१००% विकतच्या चार्‍यावर चालणारं यशस्वी गाईपालन | शुन्यातून सुरुवात करून आता महिन्याला १ लाख नफा!

हरियाणातील पशुखाद्याचे संपूर्ण नियोजन

हरियाणातील पशुखाद्याचे संपूर्ण नियोजन

तरुणांनो..! दूध व्यवसाय परवडत नाही ना🤔 ४३ गाई आणि विकतचा चारा तरी नफ्यात आहे गोठा💯 एकदा व्हिडिओ बघाच

तरुणांनो..! दूध व्यवसाय परवडत नाही ना🤔 ४३ गाई आणि विकतचा चारा तरी नफ्यात आहे गोठा💯 एकदा व्हिडिओ बघाच

♦️45 गाईंचा गोठा | महिन्याला चार ते साडेचार लाखांचं उत्पन्न ! पहा कसं केलं जातं नियोजन👍

♦️45 गाईंचा गोठा | महिन्याला चार ते साडेचार लाखांचं उत्पन्न ! पहा कसं केलं जातं नियोजन👍

गावातील तरुणाची कमाल! 38 देशांतील पर्यटक येतात या फार्महाऊसमध्ये | Ingawale Farmhouse | IFE

गावातील तरुणाची कमाल! 38 देशांतील पर्यटक येतात या फार्महाऊसमध्ये | Ingawale Farmhouse | IFE

मुक्त गोठ्याच नियोजन करण्याआधी हा व्हिडिओ नक्की पहा।बघा कस आहे परफेक्ट नियोजन।भाग 1

मुक्त गोठ्याच नियोजन करण्याआधी हा व्हिडिओ नक्की पहा।बघा कस आहे परफेक्ट नियोजन।भाग 1

क्रिकेटचा नाद सोडून झाला यशस्वी उद्योजक।24 वर्षाचा तरुण कमवतोय महिना लाखो रुपये।म्हैस पालन व्यवसाय

क्रिकेटचा नाद सोडून झाला यशस्वी उद्योजक।24 वर्षाचा तरुण कमवतोय महिना लाखो रुपये।म्हैस पालन व्यवसाय

धाराशिव येथील 70 म्हशीचा आधुनिक मुक्त गोठा ! पहा संपूर्ण मुलाखत | Dairy Farming in Maharashtra

धाराशिव येथील 70 म्हशीचा आधुनिक मुक्त गोठा ! पहा संपूर्ण मुलाखत | Dairy Farming in Maharashtra

A Morning On The Dairy Farm!

A Morning On The Dairy Farm!

तरूणाने केली दुधव्यवसाय पोलखोल 😱| एका म्हैशी पासून सुरूवात आज १ लाखाच उत्पन्न | Dairy farming story

तरूणाने केली दुधव्यवसाय पोलखोल 😱| एका म्हैशी पासून सुरूवात आज १ लाखाच उत्पन्न | Dairy farming story

दोन गायीचे 90 लिटर दूध बघा लाईव्ह मिलकिंग | Hf Cow Live Milking

दोन गायीचे 90 लिटर दूध बघा लाईव्ह मिलकिंग | Hf Cow Live Milking

गाई पालन व्यवसाय | दुग्ध व्यवसाय | Cow Farming | गाईंची निवड | बंदिस्त गोठा बांधणी #cowfarming

गाई पालन व्यवसाय | दुग्ध व्यवसाय | Cow Farming | गाईंची निवड | बंदिस्त गोठा बांधणी #cowfarming

सैनिक टाकळी येथील दोन भावांनी उभारला दुग्ध व्यवसाय |आज लाखोंचे उत्पन्न |Gokul Katta |गोकुळ कट्टा Ep2

सैनिक टाकळी येथील दोन भावांनी उभारला दुग्ध व्यवसाय |आज लाखोंचे उत्पन्न |Gokul Katta |गोकुळ कट्टा Ep2

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]