| आमच्या वागदे गावची ग्रामदेवता.पावणादेवी मंदिरातील जत्रोत्सव| २०२५ |
Автор: wagade_gavacho_adish29
Загружено: 2025-12-26
Просмотров: 216
| आमच्या वागदे गावची ग्रामदेवता.श्वी पावणादेवी मंदिरातील जत्रोत्सव| २०२५ | #jatra #yt #marathi #konkan
.
.
.
.
एखादा सण अथवा ग्रामदेवतेचा उत्सव पंचक्रोशीतील लोकांनी एकत्र येऊन साजरा करण्याच्या पद्धतीला जत्रा किंवा मेळा असे म्हणतात.
लोक संपर्क वाढविणे हा जत्रेचा मुख्य उद्देश असतो. या दिवशी गावामध्ये मनोरंजनाचे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये लोकसंपर्काच्या ज्या अनेक पद्धती आहेत त्यापैकी जत्रा ही एक अतिशय महत्त्वाची पद्धती आहे. अशा या जत्रेत लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्व स्तरातील, सर्व जाती-धर्मातील समुदाय या जत्रेत मोठ्या आनंदाने सहभागी होताना दिसतात. या अशा जत्रेतून सामाजिक एकोपा जपला जातो. ह्या धार्मिक कारणां बरोबरच आर्थिक व व्यावहारिक उलाढालींसाठी सोयीचे केंद्र असते. जत्रेच्या दिवशी लोकविधी म्हणून ' दशावतार ' हा लोक नाट्य प्रकार सादर करण्याची प्रथा असते.
आमच्या वागदे गावाची जत्रा मार्गशीर्ष महिना अखेर अमावस्येच्या तिसऱ्या दिवशी असते, गावातील सर्व मानकरी तसेच गावातील मंडळी एकत्र येऊन जत्रेचे आयोजन करतात. जत्रेला मुंबई राहणारे तसेच लग्न करून दुसर्या गावात गेलेल्या माहेरवासनी या दिवशी माहेरी येऊन आपल्या देवीची खन, नारळाने ओटी भरतात,
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: