रानभाजी आघाडा
Автор: Jeevisha Farms
Загружено: 2025-07-28
Просмотров: 29
रानभाजी आघाडा
साहित्य
1. आघाडा
2. कांदा
3. भिजवलेली चणाडाळ
4. मिरची
5. ओलं खोबरं
6. मीठ
7. तेल
कृती
▪️प्रथम आघाड्याची पाने निवडून , पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
▪️नंतर आघाडा ,कांदा,मिरची बारीक चिरून घ्या.
▪️ त्यानंतर भांड गॅसवर तापत ठेवा,आणि त्यात तेल घाला.
▪️तेल तापल्यावर त्यात मिरची, कांदा आणि चणाडाळ घालून परतून घ्या.
▪️थोडा वेळ झाकण ठेवून एक वाफ काढून घ्या.
▪️वाफ काढून घेतल्यावर त्यात चिरलेली आघाड्याची पाने आणि मीठ घालून नीट परतून घ्या.आणि भाजी शिजण्यासाठी ठेवा.
▪️भाजी शिजल्यावर वरून ओलं खोबरं घाला आणि परत एकदा नीट परतून घ्या.
▪️तयार भाजी चपाती किंवा भाकरी सोबत खाऊ शकता .
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: