Thal Khubladha Fort | थळ चा कोट | थळ ची चौबुर्जी | किल्ले खूबलढा | Maratha Navy
Автор: Sahyadri Nature Trails
Загружено: 2025-03-07
Просмотров: 1655
नमस्कार मित्रानो, सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या नवीन भागात आम्ही आपल्या सर्वांचे स्वागत करतो. ह्या भागात आपण एक आज अस्तित्वात नसलेला पण कोणेएके काळी महत्वाचा असलेला एक किल्ला पहाणार आहोत.
अलिबाग चा कुलाबा किल्ला सगळेच पहातात, अलिबाग जवळील थळ गावातून काही इतिहासप्रेमी खांदेरी जळदुर्गावर देखील जातात पण ह्याच थळ गावात देखील एक किल्ला होता हे बऱ्याच लोकांना ठाऊकच नसते कारण मराठ्यांनी मराठा राज्य सुरु असताना स्वतःहून पाडून टाकलेल्या काही मोजक्या दुर्मिळ किल्ल्यांच्या यादीत ह्याही किल्ल्याचे नाव शामिल होते. पण ह्याच किल्ल्यामुळे खांदेरीच्या निर्मितीला हातभार लागला. ह्या किल्ल्यासाठी सिद्दी व मराठ्यात सतत लढाया झाल्या. मराठा सरखेलांनी हा किल्ला जिंकून घेताना स्वतः लढत सिद्दी हबशी फौजेच्या गोळ्या अंगावर झेलल्या आहेत. चला तर मग ह्या अस्तित्वात नसलेल्या किल्ल्याची सफर करूया, चला पाहूया थळची चौबुर्जी उर्फ किल्ले खुबलढा
======================================================
संदर्भ
1) कुलाबकर आंग्रे सरखेल - दा गो ढबू
2) कन्होजी आंग्रे - मनोहर मळगावकर
3) शिवकालीन पत्र सर संग्रह खंड 2 - न ची केळकर
4) पेशवे दफ्तर खंड 24
5) पेशवे दफ्तर खंड 33
========================================================
Music Credits -
Song : SOUTH INDIAN LOVE TABLA BELLS - By Flute
/ by-flute
Music Promoted By Music Restored - Music For Content Creators
• Видео
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: