भय इथले संपत नाही (cover) | Bhay Ithale Sampat Nahi | Hridaynath Mangeshkar | Grace | Lata
Автор: Sujit Phatak
Загружено: 2013-03-25
Просмотров: 179833
Tip Jar
UPI: phatak.sujit@okaxis
भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते
ते झरे चंद्रसजणांचे ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया
त्या वेली नाजुक भोळ्या वार्याला हसवुन पळती
क्षितिजांचे तोरण घेउन दारावर आली भरती
तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातिल जणु अंगी राघवशेला
देऊळ पलिकडे तरीही तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबुळांपाशी मी उरलासुरला थेंब
संध्येतील कमल फुलासम मी नटलो शृंगाराने
देहाच्याभवती रिंगण घालती निळाइत राने
स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दु:ख कुणाचे
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे
ते धुके अवेळी होते की परतायची घाई
मेंदूतुन ढळली माझ्या निष्पर्ण तरुंची राई
-- ग्रेस
☮ ❤
'भय इथले संपत नाही'चं कव्हर. पूर्ण कविता 'चंद्रमाधवीचे प्रदेश' या कवी 'ग्रेस'च्या काव्यसंग्रहातून घेतलीए. मूळ कवितेचं नाव 'निष्पर्ण तरूंची राई'. सर्व मर्यादांसह हे रिसायटल प्रिय ग्रेसला, ग्रेसच्या पुस्तकांना प्रेमाने अर्पण.
☮
संगीतकार - हृदयनाथ
गायिका - लता
धर्मांतराच्या दिवशी मुसळधार पाऊस येईल
म्हणून वाट पाहत राहिलो; संस्कारबद्ध मंत्रांच्या
आत्मिक आघाताने डोळे मात्र भरून येत होते.
हळदफेडणीच्या व्रतस्थ वल्कलांसारखेही हे
दिवस असतील कुणी सांगावे ?
वाटले; आज तरी संध्याकाळची प्रार्थना मोडू
नये. परतीच्या पाखरांना, ढळतीच्या ढगांना
दाखवू नये पाताळातील समईचे चिमूटभर ऊन.
एखाद्या उद्ध्वस्त देवळाचा पाहावा मिळतो
का आदिम प्रस्तर
अख्खी रात्र शहरात शोधत राहिलो
एक हरवलेली प्रार्थना. सापडेच ना. आणि
मग रडवेला होऊन नाइलाजाने त्याचे थडगे
खणून काढले.
हिवाळी दैवनाट्याने गोंधळलेला एकुलता एक
घोडा तिळातिळाने सजवीत गेला आपले
कठिणतम शोक. या शहराची रसद मी
तोडून टाकीन; समुद्रबेटावर दिवस मोजणाऱ्या
वृद्ध फकिराला धाडून देईन शेवटचे अन्नपाणी.
चुकून संध्याकाळी जिवलगाच्या
मृत्यूची बातमी आली तर कुणालाही सांगू नये -
अतिशय कोवळे आहेत माझे हात.
(नाताळात पियानोची दुरुस्ती मीच करतो.)
Here's a cover of a Marathi song called 'Bhay ithale sampat nahi', by Sujit Phatak.
Dedicated to Grace, his books with love.
Poet - Grace
Composer- Hridaynath Mangeshkar
Singer- Lata Mangeshkar
☮ ❤
This is a Stereo sound version, for a Mono sound version, please watch this:
• भय इथले संपत नाही (cover) | Mono | Bhay It...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: