वरण-भात /डाळ-भात 🍚🥣महाराष्ट्रातील साधं, सात्त्विक आणि आवडतं जेवण - | Avishri Marathi Receipe |
Автор: Avishri
Загружено: 2025-12-25
Просмотров: 23
साहित्य:
तूर डाळ –½ वाटी
मूग डाळ –¼ वाटी
हळद – ¼ टीस्पून
मीठ – चवीपुरतं
पाणी – आवश्यकतेनुसार
तांदूळ – १ ½ वाटी
तेल - २–३ चमचे
तूप – सर्व्हिंगसाठी
लसूण--५–६ पाकळ्या
ओलं / सुकं खोबरं--५–६ लहान तुकडे
मोहरी--१ टीस्पून
जिरे--½ टीस्पून
हिंग--¼ टीस्पून
कढीपत्ता--८–१० पाने
कोथिंबीर--आवडीप्रमाणे
कृती:
तूर डाळ + मूग डाळ स्वच्छ धुवून कुकरच्या एका भांड्यात घ्या.
डाळीमध्ये ४–५ हिरव्या मिरच्या मधून कापून घाला. 🌶️साधारण 2 वाट्या पाणी घ्या.
तांदूळ स्वच्छ धुवून दुसऱ्या भांड्यात घ्या. 🍚१½ वाटी तांदळासाठी साधारण ३ वाट्या पाणी घ्या.
कुकरच्या तळाशी एक जाळी ठेवून, जाळी बुडेल एवढं पाणी ठेवा.
कुकरमध्ये डाळीचं भांडं खाली ठेवा आणि तांदळाचं भांडं वर ठेवा. 3 शिट्ट्या द्या.
कुकर थंड झाल्यावर उघडा ,आणि डाळीचं भांडं बाहेर काढून घ्या.
डाळ नीट घोटून घ्या.
डाळ फोडणी:
लसूण आणि खोबऱ्याचं वाटण करून घ्या.
भांड्यामध्ये तेल गरम करा. त्यात मोहरी टाका. मोहरी तडतडली की जिरे टाका. नंतर कढीपत्ता टाका.
त्यात हळद, लसूण-खोबऱ्याचं वाटण फोडणीत घाला. थोडं परता. फोडणी पूर्ण झाल्यावर हिंग टाका.
हिंग मुळे डाळ किंवा भाजीला खास चव आणि सुवास येतो. नंतर शिजलेली डाळ फोडणीत मिसळा. नीट ढवळून गरम करा. नंतर मीठ घाला.
डाळ पातळ हवी असेल ,तर तितकं पाणी टाका आणि उकळी आणा. उकळी आल्यावर कोथिंबीर घाला. कोथिंबीर मुळे चांगली चव लागते. 🌿
सर्व्हिंग:
गरम गरम भातावर वरण घाला, वरून तूप सोडा.
वरण-भात + तूप
सोबत: लिंबू, लोणचं, पापड किंवा तिखट
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: