Vida Ghya - Bharat Balvalli | विडा घ्या (मराठी) | Swami Samarth Songs | श्री स्वामी समर्थ 🙏
Автор: Universal Music Bhakti
Загружено: 2025-02-12
Просмотров: 193048
Listen to this beautiful Swami Samarth song by Bharat Balavalli, capturing the essence of devotion and divine grace. Tune in and immerse yourself in the blessings of Swami Samarth!
#BhaktiSongs #MorningMantras #UniversalMusicBhakti
Listen Now On -
JioSaavn: https://www.jiosaavn.com/song/vida-gh...
Wynk Music: https://music.apple.com/us/album/vida...
Spotify: https://open.spotify.com/track/3ooaQo...
Click for more bhakti songs: / @universalmusicbhakti
Audio Credits:
Singer - Bharat Balvalli
Lyrics - Bharat Balvalli, India Folk Song
Lyrics:
विडा घ्या हो स्वामिराया
विडा घ्या हो स्वामिराया भक्तवत्सल करुणालया
देतो हात जोडोनियां
भावें वंदुनिया पाया
विडा घ्या हो स्वामिराया
विडा घ्या हो स्वामिराया
ज्ञानदृष्टी पुगिफळ
तुमच्या कृपेचे हे बळ
मूळ आधार सोज्वळ
पापी पतित ताराया
विडा घ्या हो स्वामिराया
विडा घ्या हो स्वामिराया
भक्तीदळ नागवल्ली
पाने शुद्धही काढिली
नामबळे निर्मळ केली
सिद्ध झालो जी अर्पाया
विडा घ्या हो स्वामिराया
विडा घ्या हो स्वामिराया
रंगी रंगला हा कात
प्रेमभावाच्या सहित
त्याने केले माझे हित
देह लावियला पायां
विडा घ्या हो स्वामिराया
विडा घ्या हो स्वामिराया
चुना शांती निर्मळ
त्वांचि दिले भक्तीबळ
करुनी मनासी कोमळ
चरणी घातली ही काया
विडा घ्या हो स्वामिराया
विडा घ्या हो स्वामिराया
वेलची ज्ञानज्योत
सर्व भूतांच्या विरहित
ठेवुनी तुमच्या पायी हेत
लागे मनासी वळवाया
विडा घ्या हो स्वामिराया
विडा घ्या हो स्वामिराया
लवंग जाणां तिखट खरी
घेउनी बुद्धीच्या चतुरी
क्रोध दवडीयला दूरी
तूची समर्थ ताराया
विडा घ्या हो स्वामिराया
विडा घ्या हो स्वामिराया
वैराग्याचे जायफळ
तुम्ही दिले भावबळ
करुनी विरक्त निर्मळ
शिरी ठेवियेली छाया
विडा घ्या हो स्वामिराया
विडा घ्या हो स्वामिराया
पत्री क्षमेची या परी
बापा मिळविली बरी
सदा राहोनी अंतरी
सुखे सुखविते देहा
विडा घ्या हो स्वामिराया
विडा घ्या हो स्वामिराया
काय बदामाची मात
फोडुनि द्वैताचा हा हेत
वाढावया भक्तिपंथ
सिद्ध केला करुणालया
विडा घ्या हो स्वामिराया
विडा घ्या हो स्वामिराया
आत्महिताहित कस्तुरी
घेउनी ज्ञानभक्तीपरी
धन्य हिची थोरी
भविभवात ताराया
विडा घ्या हो स्वामिराया
विडा घ्या हो स्वामिराया
आनंद म्हणे केशर सत्य
तुमचे पायी माझा हेत
पूर्ण केले मनोरथ
कृतीकर्मासी वाराया
विडा घ्या हो स्वामिराया
विडा घ्या हो स्वामिराया
भक्तवत्सल करुणालया
देतो हात जोडोनियां
भावें वंदुनिया पाया
विडा घ्या हो स्वामिराया
विडा घ्या हो स्वामिराया
विडा घ्या हो स्वामिराया
(c) Universal Music India
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: