Shegaon Darshan | Gajanan Maharaj Mandir Shegaon | Bhaktanivas | All Information | शेगाव दर्शन
Автор: Pooja K Creative Videos
Загружено: 2025-12-15
Просмотров: 513
Shegaon Darshan | Gajanan Maharaj Mandir Shegaon | Bhaktanivas | All Information | शेगाव दर्शन
नमस्कार मी पूजा मढवी आज मी तुम्हाला शेगावच्या संत गजानन महाराजांचे दर्शन व माहिती सांगणार आहे. तसेच पाच धाम दर्शन , महाप्रसादाची वेळ व येथे आल्यावर पार्किंग ची व्यवस्था व राहण्यासाठी भक्त निवास या बद्दल माहिती सांगणार आहे.
भक्त निवासा कडून निघाल्यावर हा मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे.
मंदिरा बाहेर अश्या प्रकारे हार प्रसाद मिळतो.
हे आहे मंदिराचे प्रवेशद्वार..
हा मंदिरात जाण्याचा मार्ग आहे.
मंदिरात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला चप्पल स्टँड आहे. चप्पल स्टँड खूपच प्रशस्त आहे.ही सेवा विनामूल्य आहे. चप्पल ठेवल्यावर अश्या प्रकारे शिक्का दिला जातो.
भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय तसेच हात पाय धुण्याची सोय येथे केली आहे. व पिण्याचे पाणी आर.ओ वॉटर चे आहे.
हे आहे मंदिराचे प्रवेशद्वार
संगमरवरी दगडांचे हे बांधकाम आहे. श्री गजानन महाराजांची संजीवन समाधी या मंदिरात आहे. त्यामुळे इथल्या प्रत्येक क्षणावर महाराजांची कृपादृष्टी व उपस्थिती आवर्जून जाणवते.
गाभाऱ्याच्या बाहेर आल्यावर मंदिर परिसर प्रशस्त दिसतो. चारही बाजूंना भक्तांना बसण्यासाठी जागा आहे. ही जागा अनेक कमानिंनी वेढलेली आहे. महाराजांनी समाधी घेण्याच्या दोन वर्षांपूर्वीच या पवित्र स्थळाची निवड स्वतः केली होती.अश्या प्रकारे त्यांनी निर्देशित केलेल्या ठिकाणी व महाराजांच्या उपस्थितीतच भक्तांनी या मंदिराच्या निर्मितीस प्रारंभ केला.
मंदिर परिसरात स्वच्छ्ता कर्मचारी खूप स्वच्छता ठेवतात.
सगळीकडे स्वच्छ्ता , शिस्त आणि मनापासून सेवा करणारे सेवेकरी म्हणून या परीसरात खूप प्रसन्न आणि शांत वाटत.
महाप्रसादाची वेळ म्हणजे येथे दररोज सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत महाप्रसाद दिला जातो. विशेष म्हणजे इथला महाप्रसाद मोफत आहे. या महाप्रसादालयात पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर दोन मोठे हॉल आहेत. या ठिकाणी दररोज हजारो भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. वरण भात पिठल फळभाजी पोळी गुळाचा शिरा अशी अगदी चविष्ट अनलिमिटेड थाळी दिली जाते.
शेगाव मध्ये आल्यावर येथील फेमस अशी शेगाव कचोरी खायला विसरु नका तसेच येथील डाळ वडा खूप चविष्ट आहे.
आता शेगाव मध्ये रहायची उत्तम सोय म्हणजे येथील भक्तनिवास.
या भक्तनिवासाच्या सहा इमारती आहेत.
येथे बारा महिने भाविकांची प्रचंड गर्दी असते. रूम मिळण्यासाठी खूप वेटींगला रहावे लागते.
भक्त निवासाला येण्याआधी वाहन पार्किंग सोय येथे उपलब्ध आहे.भक्त निवास ते पार्किंग अंतर एवढ्या जवळ आहे.
आता मी तुम्हाला पाच धाम दाखवत आहे.
हे आहे श्री गजानन महाराज प्रकट स्थान
आता आपण आलोत श्री गजानन महाराज प्रकट स्थळावर. गजानन महाराज शेगाव मध्ये सर्वात प्रथम याच ठिकाणी प्रकट झाले होते. बंकटलाल आणि दामोदर पंत यांनी सर्वात प्रथम महाराजांना ओळखले. ते असे की एके दिवशी देविदास पातुरकरांच्या घरी जेवणाचा कार्यक्रम होता तेव्हा उष्ट्या पत्रावळ्या या वडाच्या झाडा समोर टाकल्या होत्या. तेव्हा एक व्यक्ती त्या उष्ट्या पत्रावळ्यानमधून शिते वेचून खात आहेत हे दृष्य सर्व प्रथम बंकटलाल व दामोदर पंत यांनी पाहिले . तेजोमय व अजाण बाहो असलेली ही व्यक्ती म्हणजेच साक्षात परमेश्वराचा अवतराच असली पाहिजे अश्या प्रकारे बंकटलाल व दामोदर पंत यांनी हे ओळखले. श्री गजानन महाराज सर्वात प्रथम या वडाच्या झाडाखाली २३ फेब्रुवारी १८७८ रोजी प्रकट झाले होते.
आता आपण चाललोयत देवीदास पातुरकरांच्या सदनात. हे आहे देवीदास पातूरकरांचे सदन.संस्थेस ही जागा प्राप्त झाल्यानंतर या ठिकाणी हे श्रींचे स्मारक व स्मृती मंदिर साकार झाले.
आता आपण चाल्लोय बंकट सदनात मगाशी सांगितल्या प्रमाणे श्री गजानन महाराजांना सर्वात प्रथम बंकटलाल यांनी पाहिले होते . हे बंकट सदन म्हणजे एक इमारत नाही तर भक्ति भावाच आणि श्रद्धेच प्रतीक आहे. श्री बंकट स्वामी त्याकाळी प्रसिद्ध सावकार होते. पण त्यांचं भाग्य असं की त्यांना श्री गजानन महाराजांच्या अवतारी पुरुषाचं सानिध्य लाभल.म्हणतात न जिथे भक्ति आणि श्रद्धा असते. तिथेच देव आपोआप प्रकट होतो. महाराजांनी येथे वास्तव्य करून अनेक भक्तांना दर्शन दिलं. आणि त्यांच्या लीलांनी संपूर्ण शेगाव धन्य केलं.
आता आपण आलो आहोत श्री मारुती मंदिरात.
गजानन महाराजांनी गावचे खंडू पाटील आणि त्यांच्या मित्र बंधूंच्या शक्तीचा गर्व याच मारुती मंदिरा मध्ये उतरवला ते झाले असे,मारुती मंदिरामध्ये गजानन महाराज विश्रामाला बसले असताना. खंडू पाटील व त्याचे मित्र बंधूं आले. व तावा तावाने महाराजांना तेथून उठायला सांगत होते. व ते महाराजांना उठवायला गेले असता त्यांचे प्रत्येक प्रयत्न असफल ठरले पण महाराज काय जागचे उठेना मग त्यांनी ऊसाने महाराजांना मारायची सुरुवात केली ऊसाने मारून मारून पाटील बंधू थकले पण महाराज काय जागचे उठले नाही शेवटी महाराजांनी त्याच ऊसाचा हाताने रस काढून त्या थकलेल्या पाटील बंधूंना दिला. हे पाहिल्यावर ते महाराजांना शरण गेले.
आता आपण आलोय महादेव मंदिरात अतीपुरातन शिव गाव चे हे शिव मंदीर शिव गाव चे कालांतराने शेगाव असे नामकरण झाले. श्री गजानन महाराज या मंदिरात बसून ध्यान धारणा करीत असे. या मंदिरात आपल्याला पुरातन शिवपिंडीचे दर्शन घडते. भगवान् विष्णूंनी सुंदर मूर्ती या मंदिरात आहे. तसेच श्री गजानन महाराजांची सुंदर प्रतिमा या मंदिरात आहे. याच मंदिरा समोर श्री गजानन महाराजांनी एका द्वाड गाईला व एका उंन्हाड घोड्याला शांत केले होते.
हा आहे कृष्णांजिंचा मळा या मल्यामध्ये सुंदर मंदिर आहे. मंदिरात श्री गजानन महाराज व शिवपिंडी चे दर्शन आपल्याला घडते. कृष्णाची पाटील यांच्या याच मळ्यात आलेल्या भोंदू ब्रम्हगीरी गोस्वामींचे श्री गजानन महाराजांनी जळत्या पलंगावर बसून गर्व हरण केले होते. या प्रसंगाचे श्री गजानन विजय ग्रंथात केलेले वर्णन या ठिकाणी लिहिले आहे. व चीत्राद्वारे हा प्रसंग येथे दर्शवला आहे.
हे होते श्री गजानन महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेले पाच धाम.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: