लल्लाटी भंडार या गाण्यावरती सुंदर असे सादरीकरण...
Автор: स्वरदर्पण
Загружено: 2023-10-19
Просмотров: 316005
गाण्याचे बोल:
घे लल्लाटी भंडार
नदीच्या पल्याड आईचा डोंगुर
डोंगरमाथ्याला देवीचं मंदीर
घालु जागर जागर डोंगर माथ्याला
घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार
नदीच्या पान्यावर आगीनं फुलतं
तुझ्या नजरेच्या तालावर काळीज डुलतं
नाद आला गं आला गं जीवाच्या घुंगराला
घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार
नवसाला पाव तू, देवी माझ्या हाकंला धाव तू
हाकंला धाव तू देवी माझ्या अंतरी रहावं तू
देवी माझ्या अंतरी राहावं तू काम क्रोध परतुनि लाव तू
काम क्रोध परतुनि लाव तू, देवी माझी पार कर नाव तू
डोळा भरून तुझी मुरत पाहीन,
मुरत पाहीन तुझा महिमा गाईन
महिमा गाईन, तुला घुगऱ्या वाहीन
घुगऱ्या वाहीन, तुझा भंडारा खाईन
दृष्ट लागली लागली हळदीच्या अंगाला
घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार
यल्लम्मा देवीचा जागर ह्यो, भक्तीचा सागर
निवदाची भाकर दाविती ही जमल्या गं लेकरं
पुनवंचा चांदवा देवीचा गं मायेचा पाझर
आई तुझा मायेचा पाझर, जागर ह्यो, भक्तीचा सागर
खणानारळानं वटी मी भरीन,
वटी मी भरीन तुझी सेवा करीन
सेवा करीन, तुझा देवारा धरीन
देवारा धरीन, माझी वंजळ भरीन
आई सांभाळ सांभाळ कुशीत लेकराला
घे लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार
यल्लम्मा देवीचा जागर ह्यो, भक्तीचा सागर
निवदाची भाकर दाविती ही जमल्या गं लेकरं
पुनवंचा चांदवा देवीचा गं मायेचा पाझर
आई तुझा मायेचा पाझर, जागर ह्यो, भक्तीचा सागर
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: