मच्छिवाली आली मासे विकायला 😍 | बायकोने बनवलं बोंबील फ्राय - Ambavali, Mandangad (Konkan)
Автор: S FOR SATISH
Загружено: 2021-07-12
Просмотров: 933493
मच्छिवाली आली मासे विकायला 😍 | बायकोने बनवलं बोंबील फ्राय - Ambavali, Mandangad (Konkan) आमच्या गावी खाडीची मच्छि विक्री करायला केळशीतून महिला येत असतात. वर्षाच्या बारा महिने आमच्या गावी मासे विकायला केळशी गावातून महिला येतात. या मावरेवल्या विशिष्ट आवाजाने हाक मारून मासे विकतात. माशांमध्ये बोंबील, बांगडा, जवळा, कोळंबी अशाप्रकारचे मासे असतात. अशीच एक नेहमीची मच्छिवाली मासे विकायला आली असता आम्ही तिच्याकडून मासे खरेदी केले. आम्ही बोंबील आणि शेलभेल म्हणजे मिक्स मच्छि खरेदी केली. ही खाडीची मच्छि साफ करण्याची सुद्धा कला असते. बोंबील फ्राय करण्यासाठी कसे साफ करतात ते वर्षाने दाखवले आहे. शेलभेल मासे मी साफ केले. बोंबील फ्राय करताना आम्ही घरगुती मसाले वापरले. बोंबील फ्राय करताना म्यारीनेशन केले. आंबटपणा येण्यासाठी लिंबू पिळला. हळद मीठ मसाला आलं लसूण पेस्ट घालून मस्त ठेवला. तांदळाचे पीठ आणि रवा मिक्स करून त्यात थोडं मीठ घालून आम्ही बोंबील फ्राय करून घेतले. सोबत बाजूला मच्छिचे कालवण घातले. गावच्या पद्धतीने वर्षाने मच्छिचे कालवण तयार केले. रात्री आम्ही सर्वजण मिळून पंगतीने जेवण केले. बोंबील फ्राय अतिशय कुरकुरीत झाले होते शिवाय कालवण एकदम झणझणीत आणि चविष्ट झाले होते. या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमच्या गावी मच्छिवाल्या मासे कसे विकतात ते दाखवलेले आहे आहे. गावाला मासे किती स्वस्त मिळतात, कोणकोणते मासे विक्रीला असतात ते दाखवले आहे आणि आम्ही घरी बनवलेले बोंबील फ्राय दाखवले आहेत. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #MachchivaliAaliMaseVikayala #BombilFryRecipe #KurkuritBombilfry #sforsatish
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: