नगर मध्ये झेंडीगेट परिसरात कत्तलखाना पोलिसांकडून व महानगरपालिका यांनी उध्वस्त करण्यात आले
Автор: MJ News 90
Загружено: 2025-09-19
Просмотров: 23636
पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घार्गे यांची अवैध्य कत्तल खाने व गोमांन्स विक्री विरोधात कडक कारवाई.
श्री सोमनाथ घार्गे यांनी अहिल्यानगर पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्विकारले नंतर भारत सरकार व महाराष्ट्र शासनाचे तर्फे गोहत्याबंदी संदर्भात कडक कारवाईचे आदेश प्राप्तअसले कारणास्तव अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध्यरित्या चालनारे कत्तलखाने, अवैध्यारत्या गोवंशीय जातीची जनावराची वाहतुक करणारे त्यांची कत्तल करुन मांसांची विक्री करणारे इसमाचे विरुद्ध कडक कारवाई करण्याची भुमिका घेऊन अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलीस स्टेशन प्रभारीअधिकारी यांना सदर बाबत कडक कार्यवाही करणेबाबत आदेश पारीत केले होते.
असे असतांना कोतवाली पोलीस स्टेशन तसेच इतर शाखेच्या मार्फत कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील झेंडीगेट भागात वेळोवेळी कायदेशीर कारवाई करुन वेळोवेळी गुन्हा दाखल करुन त्या गुन्ह्यांमध्ये वेगवेगळ्या वर्णाचे गोवंश जातीचे पशु ताब्यात घेतले होते तसेच कापलेल्या गोवंशीय जनावरांचे गोमांन्स पण ताब्यात घेऊन त्यांचे कायदेशीर विल्हेवाट लावली. सदर कारवाईमध्ये ताब्यात घेतलेल्या आरोपीतांचेवर कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले आहे तसेच सदर गुन्ह्यातील आरोपीतांचेवर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करुन त्यांचे चांगल्या वर्तनुकीचे बॉण्ड पण घेण्यात आलेआहे.
श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक यांचे आदेशाने कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत अवैद्यरित्या जे आरोपी कत्तल खाने चालवितात त्यांची टोळी तयार करुन मुबई पोलीस अधिनियमा अन्वये इसम नामे) ओवेस रशिद शेख वय २४ वर्ष रा. आंबेडकर चौक, शाळा नंबर ४ झेंडीगेट अहिल्यानगर, २) शोएब रौफ कुरेशी वय २८ रा. कारी मस्जिद जवळ बाबाबंगाली, अहिल्यानगर ३) फैजल अस्लम शेख, वय१९ रा.घर नंबर १८४६, हमालवाडा, झेंडीगेट अहिल्यानगर ४) मुसाबीर युसुन कुरेश वय २२ रा.झेंडीगेट अहिल्यानगर यांचे विरुद्ध मा. पोलीस अधीक्षक सो। अहिल्यानगर यांचे कार्यालयात ५५ प्रमाणे प्रस्तव सादर केला त्याप्रस्तावानुसार श्री सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक यांनी वरील कुरेशी (गोवशीय जनावरांची वाहतुक व हत्या करणारी) लोकांची टोळी प्रथमच अहिल्यानगर जिल्हयातुन १ वर्षाकरीता हद्दपार केले तसेच इतर आरोपीतांचे विरुद्ध प्रस्ताव तयार करण्यात आलेअसुन त्यावर कार्यवाही चालु आहे.
कोतवाली पोलीसांकडुन ठिकाणी छापे टाकले त्याठिकाणचा पंचनामा केला असता सदरची जागी ही कोणाच्या मालकीची आहे हे निष्पन्न होत नसल्याने कोतवाली पोलीस स्टेशन कडुन सदर जागेत अवैध्यरित्या कत्तलखाने चालु आहेत सदरचे कत्तलखाने उद्धवस्त करणे बाबत पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे मार्फतीने पोलीस निरीक्षक कोतवाली पोलीस स्टेशन यांनी अहिल्यानगर महानगरपालीकेचे आयुक्त यांना पाठवुन आपले अधिपत्या खालील अतिक्रमण विभागाकडुन १) कारी मस्जिद समोर व्यापारी मोहल्ला झेंडीगेट अहिल्यानगर, २)२२ नंबर मस्जिद शेजारी, झेंडीगेट अहिल्यानगर ३) बागवान गल्ली, ए.वन. बिर्याणी हाऊसचे पाठीमागे झेंडीगेट अहिल्यानगर, ४) सरकारी सौचालयाचेसमोर व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट अहिल्यानगर ५) कुरेशी मस्जिदजवळ झेंडीगेट, अहिल्यानगर अशा ठिकाणी चालु असलेले अवैध्य गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल केली जाते अशा कत्तल खान्यावर आपले स्थरावर कायदेशीर उपाययोजना करुन कतलखाने कायम
स्वरुपी बंद करण्यात यावेत असा प्रस्ताव मा. आयुक्त साहेब अहिल्यानगर महानगरपालीका यांना सदर करण्यात आला होता. त्यानुसार झेंडीगेट परिसरातील २ अवैध्यरित्या चालु असलेल्या कत्तखान्यावर कायदेशीर कारवाई करुन सदर चे कत्तलखाणे यापुर्वीच जमिन दोस्त करण्यात आले होते.
श्री सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक यांनी अहिल्यानगर शहरातील अवैध्य गोवंशीय जातीचे जनावरांची वाहतुक करणारे त्यांची हत्या करुन गोमांसांची विक्री करणारे त्यांना जागा उपलब्ध करुन देणारे तसेच वाहतुकीकरीता मदत करणारे अशा लोकांची अहिल्यानगर पोलीस दल गय करणार नाही त्याचे विरुद्ध कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल असे कळविण्यात आले होते त्या अनुषंघाने आज दिनांक १८/०९/२०२५ रोजी श्री सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी अशा प्रकारचे अवैध्य कत्तलखाने ज्या ज्या ठिकाणी चालुन आहेत अशी ठिकाणे शोधुन जास्तीत जास्त कत्तखाने जमिन दोस्त झाले पाहीजे जेणे करुन गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल होणार नाही याकरीता कडक पावले उचल्या नंतर पोलीस प्रशासन व मा.आयुक्त श्री यशवंत डांगे, अहिल्यानगर महानगरपालीका यांच्या संयुक्त कारवाईत अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील झेंडीगेट येथील ५ कत्तखाने जमिन दोस्त करण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही ही मा.पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घार्ग, अहिल्यानगर, मा. आयुक्त श्री यशवंत डांगे. अहिल्यानगर महानगर पालीका, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलबुर्गे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री शिरीष वमने यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, तोफखाना पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक कोकरे साहेब, सपोनि वारुळे सो, सपोनी तेजश्री थोरात, पोसई। प्रविण पाटील पोसई गणेश देशमुख, पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी सो, कोतवाली पोलीस स्टेशनचे १०० अंमलदार व अहिल्यानगर महानगरपालीका यांचेकडील अतिक्रमण हटाव पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.#mjnews90 #news #come #crime #police #people #ahmednagar #महाराष्ट्र #अहमदनगर #छत्रपतीशिवाजीमहाराज
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: