NAKO JAU GAURI GA SONG | MEGHASWAR GAURI GEET (Official Video 2025)
Автор: Meghaswar music
Загружено: 2025-07-31
Просмотров: 600428
नको जाऊ गौरी गं |
गीत : सुरेश म्हात्रे; स्वर : अश्विनी म्हात्रे, प्रतीक्षा म्हात्रे , प्रतीक्षा पाटील; संगीत : अक्षय ठाकूर
कौलारू माडी ग,हिरव्या बागा कोकणा ...
तिथ माझा माहेर,गवराय बोले देवाना.!!धृ!!
सागरी लाटा ग, माझे माहेरच्या वाटा...
देवा मी जातय हॊ, दर्या वटला आता...
टेढा ग फुलेला, झाला फुलांचा वझा.....
माहेरी भादव्याचा, सन आलाय माझा...
नको जाऊ गौरी ग, दुर माहेर तुझा....
सागरी लाटा ग, माझे माहेरच्या वाटा...
देवा मी जातय हॊ, दर्या वटला आता... !!1!!
शेताचे बांधावर,लव्हा घेतंय लोलना...
माय बाप वाट बघतान , दोघा उभी आंगना....
नको जाऊ गौरी ग, चित्त लाग नाय ध्याना
सागरी लाटा ग माझे माहेरच्या वाटा...
देवा मी जातय हॊ दर्या वटला आता...!!2!!
फुलापांना सजली ग नाव उभी काठाला...
शंक्रूबा मुल्हारी माझे हाय हो संगतीला...
नको जाऊ गौरी ग सुना होईल आंगना...
सागरी लाटा ग माझे माहेरच्या वाटा
देवा मी जातय हो दर्या वटला आता.. !!3!!
बाल माझा गणपती, देवा गेला धरतीला...
भक्ताचे भेटीला गना माझा धावला...
जा ग तू गौरी ग, घेऊन ये ग गनाला....
सागरी लाटा ग, माझे माहेरच्या वाटा......
देवा मी जातय हो दर्या वटला आता... !!4!!
सुरेश म्हात्रे, पेण.
#sagarilata
#गवरायगीत #गौरी #गणपती #फेऱ्या #गाणी #सागरी लाटा ग कौलारू माडी गं ..#suresh mhatre song #feryanchigaani | #लोकगीत #आगरीफेऱ्यांची गाणी #koligeet #meghaswarSong #marathiSongs
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: