श्रीशैल्यम दर्शन I श्रीशैल्यम मधे असलेल्या महत्त्वाच्या स्थानांची माहिती I Srisailam I
Автор: Explore With Carlekar
Загружено: 2025-05-17
Просмотров: 19980
नमस्कार मित्रांनो..
आज सकळी लवकर उठून आम्ही सगळ्यांनी सर्वप्रथम श्री मल्लिकार्जुन स्वामींचे दर्शन घेतले आणि तसेच मंदिराच्या आवारात असलेल्या श्री भ्रमरंभादेवीचे दर्शन घेतले आणि आम्ही पुन्हा आमच्या हॉटेल वर आलो जिथे आम्ही सकाळचा नाश्ता केला आणि थोडावेळ आराम केला..
त्यानंतर आम्ही साडे अकरा वाजता बाहेर पडलो ते श्रीशैल्यम मधे असलेल्या इतर महत्वाच्या मंदिरांना आणि स्थानांना जाण्यासाठी..
ह्या मधे मला ज्या ठिकाणी जाण्याची मनापासून खूप तीव्र इच्छा होती ते म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर आहे तिथे जाण्यासाठी.
मग आम्ही आमच्या हॉटेल मधून बाहेर पडलो आणि जवळच आम्हाला एका रिक्षावाले भेटले जे आम्हाला सहा जणांना श्रीशैल्यम मधे असलेल्या सर्व महत्त्वाचे ठिकाणी घेऊन जाण्यास तयार झाले ..
आणि अशा पद्धतीने आमची आजीची श्रीशैल्यम दर्शन यात्रा सुरू झाली..
मंडळी आम्ही कोणत्या कोणत्या ठिकाणी गेलो तिथे काय काय बघितले हा आमचा अनुभव कसा होता ह्याची सर्व माहिती मी आपल्याला ह्या व्हिडिओ च्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे
तरी आपण हा व्हिडिओ शेवट पर्यंत बघावा
#श्रीशैल्यममधेअसलेलीमहत्त्वाचीस्थाने
#श्रीशैल्यं #हरितारिसॉर्ट्सश्रीशैल्यम #श्रीमल्लिकार्जुनमंदिरश्रीशैल्यम #श्रीशैल्यमज्योतिर्लिंग #श्रीमल्लिकार्जुनमहादेव #श्रीशैल्यंदर्शनयात्रा
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: