९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा.
Автор: Naresh Save
Загружено: 2026-01-01
Просмотров: 226
#मराठी #मराठी संमेलन##संस्कृति #संत #संगीत #marathi #marathisammelan#sahitya #maharashtra #satara #raje
#marathi #sahitya #sammelan
• मराठी साहित्य संमेलन Sahitya Sammelan
९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा ०१/०१/२०२६ ते ०४/०१/२०२६
९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा.
०१/०१/२०२६ ते ०४/०१/२०२६
संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील ह्यांच्या भाषणातील उतारा.
माय मराठीच्या बंधू भगिनींना माझा मानाचा मुजरा.
एकूणच मायमराठीच्या अस्तित्वाची लढाई आता प्रत्येकाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहे.
उद्या तुमच्या देव्हाऱ्यावर विठोबा समवेत ज्ञानेश्वर आणि तुकारामाच्या प्रतिमा टिकाव्यात असे वाटत असेल तर वेळीच झोपेतून जागे व्हा.
तुमच्या खांद्यावर झेंडा कोणत्याही जातीचा, पक्षाचा, वा धर्माचा असू दे.त्याचा दांडा हा मराठीच असायला हवा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पाळणा हलवताना त्यांच्या मातोश्री भीमाबाईच्या मुखातून, महात्मा फुले यांच्या पाळण्याची दोरी ओढताना त्यांच्या माता चिमणाबाईच्या ओठातून आणि बाळ शिवरायांना जोजावताना जिजाऊ साहेबांच्या कंठातून बाहेर पडलेल्या महन्मंगल ओव्या फक्त मराठी भाषेतच होत्या, या गोष्टीचा अजिबात विसर पडू देऊ नका.
लवकरात लवकर जागे व्हा.
अन्यथा असेच गुंगीत राहाल, तर कायमचे संपून जाल.
भाषा मराठी हीच असावी आमच्या ललाटी !
म्हणून बाप हो, साताऱ्याची ही पवित्र भूमी सोडताना एक पवित्र शपथ घेऊ या.
आमची माय मराठी वाचवू या.
फक्त ज्ञानोबा आणि तुकोबाच्या पालख्या नाचवू या.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: