Bahadurgad | धर्मवीरगड - बहादूरगड - पांडे पेडगावचा भुईकोट | Chh. Sambhaji Maharaj Forts & History
Автор: सह्याद्रीच्या गडवाटा
Загружено: 2019-12-19
Просмотров: 105331
इतिहास - १३व्या शतकात देवगिरीच्या यादवांच्या काळात या भुईकोट किल्ल्याचे बांधकाम झाले. " पांडे पेडगावचा भुईकोट " असे त्याचे त्यावेळचे नाव होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वेरूळचे बाबाजी भोसले यांच्याकडे हा भुईकोट मोकास (देखभालीसाठी) होता. त्यानंतर निजामशाहीची सत्ता व कालांतराने मोगलांच्या ताब्यात हा किल्ला गेला. औरंगजेबाचा दुधभाऊ बहादुरखान कोकालताश हा या किल्ल्याचा त्या वेळी किल्लेदार होता. तो स्वतःला दक्षिणेचा शहेनशाह समजत असे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक नुकताच पार पडला होता. त्यासाठी अमाप खर्चही झाला होता. तो खर्च भरून काढायला बहादुरखानाने आपण होऊन शिवाजीराजांना संधी दिली. बहादुरखानाने गडामधे एक कोटीचा शाही खजिना आणि दोनशे उत्तम प्रकारचे अरवी घोडे औरंगजेबाकडे पाठविण्यासाठी गोळा केले होते. महाराजांच्या हेरांनी सगळा तपशील गोळा करून आणला होता. महाराजांनी आपल्या सरदाराबरोबर नऊ हजाराचे सैन्य बहादुरगडावर खजिना आणण्यासाठी पाठवले. या सरदाराने आपल्या सैन्याचे दोन भाग केले. एक दोन हजाराचा तर दुसरा सात हजाराचा. दोन हजाराच्या तुकडीने गडावर जोरदार हल्ला केला. या तुकडीचा उद्देश गडबड उडवून देण्याचा होता तो सफल झाला. बहादुरखान लढाईसाठी तयारी करून मराठ्यांच्या सैन्यावर धावून गेला. त्यावेळी मराठ्यांच्या तुकडीने माघार घेऊन पळायला सुरुवात केली. त्यामुळे बहादुरखानाला चेव चढला. त्याने मराठ्यांना गाठण्यासाठी त्यांचा जोरदार पाठलाग सुरू केला. मराठ्यांनी बहादुरखानाला हुलकावणी देत देत खूप लांबवर आणून सोडले. दरम्यान मराठ्यांच्या उरलेल्या सात हजारांच्या सैन्याने बहादुरगडावर हल्ला चढवला. गडामधे तुरळक सैन्य, नोकरचाकर आणि बाजारबुणगेच उरले होते. मराठ्यांनी खजिना आणि घोडे ताब्यात घेऊन रायगडाकडे कूच केले. बहादुरखान पाठलागावरून परत आला, तेव्हा त्याला मराठ्यांनी शाही खजिना लुटल्याची बातमी कळाली. तेव्हा त्याला मराठ्यांच्या बहादुरीची खरी जाणीव झाली. खजिना घालवून आणि कशीबशी आपली इभ्रत वाचवून या पेडगावच्या शहाण्याला गप्प बसावे लागले होते.
छत्रपती संभाजी राजांना अटक - छत्रपती संभाजी राजांना संगमेश्वरला पकडल्यानंतर औरंगजेबाने आपली स्वतःची अकलूजला असलेली छावणी पेडगावला आणली. त्यानंतर याच गडावरून त्यांची उंटावर बसून विदुषकी टोप्या घालून अचकट विचकट वाद्ये वाजवीत धिंड काढली गेली. . त्यानंतर त्यांना औरंगजेबासमोर हजर करण्यात आले.
#Bahadurgad#Dharmvirgad#PedgaonFort#Chh.SambhajiMaharaj
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: