TV मालिका, जपानी नवरा, अध्यात्म आणि बरंच काही | Pratima Kulkarni | Woman Ki Baat | Mugdha Godbole
Автор: आरपार | Aarpaar
Загружено: 2025-06-21
Просмотров: 93365
प्रतिमा कुलकर्णी — एक सशक्त लेखिका, संवेदनशील दिग्दर्शिका आणि सखोल अनुभवांनी समृद्ध झालेली स्त्री. आपल्या Woman Ki Baat या सेगमेंटमध्ये येणाऱ्या स्त्रिया केवळ त्यांच्या कलात्मक प्रवासाच्या गोष्टी सांगत नाहीत, तर स्वतःच्या आयुष्याचं प्रत्येक वळण प्रेक्षकांसमोर उलगडून ठेवतात – प्रामाणिकपणे, खोलवर आणि आत्मीयतेने.
३५-४० वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या लेखिका-दिग्दर्शिका प्रतिमा ताईंकडे अनेक गोष्टी होत्या सांगण्यासारख्या, ज्या त्यांनी सुंदर पद्धतीने सांगितल्या. अनेक किस्से सांगितले. लेखन कसं घडलं, दृश्यं कशी उभी राहिली, आणि त्या त्या वेळेच्या त्या कहाण्या आजही का आठवतात याबद्दल त्या बोलल्या. दिग्दर्शन करताना स्त्री म्हणून त्यांना कुठल्याच गोष्टीत अडचणी आल्या नाहीत, असं त्यांनी आवर्जून सांगितलं.
त्यांचं जपानवरचं प्रेम, जपान या देशासाठी वाटणारी भावनिक ओढ त्यांनी या गप्पांमध्ये व्यक्त केली — "माझा आत्मा जपानचाच आहे," असं त्यांचं स्पष्ट मत आहे. त्यांचं जपान कनेक्शन म्हणजेच जपानी व्यक्तीशी झालेलं लग्न आणि त्यानंतरचं सेपरेशन — यावरही त्यांनी खूप खुलेपणाने मत मांडलं आहे.
पुढे बोलत असताना, त्यांच्या आयुष्यात अध्यात्म कसं आलं आणि अध्यात्माचा त्यांच्यावर कसा प्रभाव पडला, याचाही त्यांनी सखोल उलघडा केला. थोडक्यात काय तर.. या पॉडकास्टमध्ये तुम्हाला फक्त किस्से ऐकायला मिळणार नाहीत, तर एक जिवंत अनुभव, जो हळूहळू तुमच्या मनालाही स्पर्श करेल — असं काहीसं खास तुम्ही अनुभवू शकाल..
‘आरपार’ चा हा पॉडकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, ३० वर्षांच्या आर्थिक विश्वासाचा वारसा जपणाऱ्या लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड चे मिळालेले प्रायोजकत्व हे आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.
लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडः
https://www.lokmanyasociety.org/?utm_...
त्याचप्रमाणे, ऑरगॅनिक ब्युटी प्रॉडक्ट्स साठी प्रसिद्ध असलेले आमचे
Gifting Partner
'बरवा' यांचेही खास आभार.
https://barvaskintherapie.com/?gad_so...
Woman Ki Baat Credits:
Producer - Ashwini Teranikar.
Host - Vinod Satav / Mugdha Godbole.
Research - Nikhil Mane, Maithily Apte, Shivprasad Dhage.
Content Head - Shivprasad Dhage, Maithily Apte.
Video Production, Coordination - Maithily Apte, Nikhil Mane.
Camera - Sourabha & Team.
Video Editing - Sameer Sayyad.
Reel Editing - Ankita Bhosale, Sameer Sayyad, Vedant Dhawade.
Other Assistance - Sulindar Mukhiya.
00:00-परिचय
02:22-दिग्दर्शक प्रतिमा कुलकर्णी यांची ओळख
05:05-दिग्दर्शन आणि नाटक यातील प्रवास
08:04-दिग्दर्शनाचे आव्हाने आणि पहिली टीव्ही संधी
12:23-विजयाबाई आणि सुलभाताई यांच्यातील फरक
21:12-सिरीयल्समधील संयुक्त कुटुंबाची संकल्पना
34:21-जपानी संबंध आणि सांस्कृतिक अनुभव
54:04-आध्यात्मिक श्रद्धा आणि उपचार केंद्र
01:00:46-महि कारी केंद्र आणि जीवनाच्या शिकवणी
01:04:17-नाटकांमधील महिला भूमिका आणि सामाजिक प्रभाव
01:06:13-सृजनात्मक सहकार्य आणि आभार
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: