नगरपालिका निवडणूकीवरून आ.तानाजी सावंतांचे मोठे व्यक्तव्य
Автор: M D Live Marathi
Загружено: 2025-11-08
Просмотров: 4530
#mdlivemarathi #dharashiv #धाराशिव नगरपालिका निवडणूकीवरून आ.तानाजी सावंतांचे मोठे व्यक्तव्यमाजी मंत्री आणि भूम-परांडा-वाशी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रा.डॉ. तानाजीराव सावंत साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली आज वाशी येथे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाची भव्य बैठक उत्साहात संपन्न झाली.
यावेळी बोलताना आमदार सावंत साहेबांनी वाशी तालुक्यात केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचा उल्लेख केला. "या विकासकामांच्या बळावर जनता नक्कीच आगामी निवडणुकीत शिवसेनेला विजयी करेल," असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. भूम-परांडा-वाशी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, "प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे," अशी ग्वाही त्यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिली.
या बैठकीस शिवसेना जिल्हाप्रमुख, वाशी शहरातील व तालुक्यातील प्रमुख प्रतिनिधी यांच्यासह शिवसेना, युवसेना पदाधिकारी, असंख्य कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
: Office of Tanajirao Sawant
#स्थानिक_स्वराज्य_संस्था #निवडणूक२०२५ #shivsena #भूम #परांडा #वाशी #TanajiSawant #शिवसेना
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: