बांदा येथे दोडामार्ग ते माणगांव पालखी पदयात्रेचे स्वागत
Автор: BANDA PLUS ASHUTOSH BHANGLE
Загружено: 2025-11-29
Просмотров: 598
Banda Plus (29.11.25) - दोडामार्ग ते माणगाव श्री टेंबे स्वामींच्या माणगाव पालखी पालखी पदयात्रेला शुक्रवार दिनांक 28 पासून आरंभ झाला असून मार्गात जागोजागी त्यांचे स्वागत केले जात आहे यंदाचे या पालखी सोहळ्याचे आठवे वर्ष असून प्रतिवर्षी या पदयात्रेतील भाविकांचा सहभाग वाढता आहेशनिवारी पहाटे गणपती मंदिर येथून पायी पालखी प्रस्थान झाले. मार्गात
सासोली ,कळणे , आडाळी,डेगवे येथील भाविकांनी पालखीचे स्वागत, पुजन, अल्पोपहार, महाप्रसाद आदी सेवा केली.
सायंकाळी ५.३० वा. संत सोहिरोबानाथ आंबिये मठ, बांदा येथे पालखीचे आगमन झाले. यावेळी पूजन ,आरती झाली. चहापानानंतर पालखीचे प्रस्थान झाले.पुढे दत्तमंदिर इन्सुली कस्टम ऑफिस येथे आरती व पुजन,
संत सोहिरोबानाथ आत्मसाक्षात्कार मंदिर इन्सुली डोबाशेळ येथे पालखी पूजन, आरती, भजन ,महाप्रसाद रात्रौ भजन सेवा व पालखी मुक्काम .रविवार दि. ३० नोव्हेंबर- पहाटे ५.०० वा. आरती, पालखी पूजन व माणगांवकडे पालखी प्रस्थान असा नियोजित कार्यक्रम आहे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: