🚩 मराठी नाटक - रायगडाला जेव्हा जाग येते 🙏🚩
Автор: ⚔️ मराठी मुंडा ⚔️
Загружено: 2025-02-25
Просмотров: 42850
छत्रपती शिवाजी महाराजांच्या हृदयातील शल्य कथन करणारे नाटक
वसंत कानेटकर यांनी लिहिलेले नाटक 'रायगडाला जेव्हा जाग येते' हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यातील नाते सांगते. हे नाटक मराठीतील सर्वकाळातील सर्वोत्कृष्ट आणि लोकप्रिय नाटकांपैकी एक आहे.
या नाटकाची कथा:
रयतेच्या राजाची आणि युवराजांची कुटुंबातील कलह सावरून घेण्यासाठी सुरू असलेली धडपड
शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यातील अंतर्मुख करणारा संवाद
शिवाजी - एक राजा तसेच वडील आणि त्यांचा मोठा मुलगा संभाजी - यांचा नैसर्गिक उत्तराधिकारी यांच्यातील नाते शोधणे.
या नाटकाची वैशिष्ट्ये:
हे नाटक इतिहास मांडते आणि इतिहास घडवते
या नाटकाने ऐतिहासिक नाटकांची व्याख्याच बदलली
मराठी नाट्यसृष्टीतील अतिशय दिग्गज कलाकारांनी या नाटकाला न्याय दिला आहे
या नाटकाचे हजारो प्रयोग झाले आहेत
रायगडाला जेव्हा जाग येते’ हे एक ऐतिहासिक नाटक. ऐतिहासिक एवढ्याच अर्थाने की त्यातली नाट्यवस्तू इतिहासातून कोरून काढलेली आहे.
समाजजीवनातील अंतःस्रोत जाणून घेण्याच्या दृष्टीने इतिहास महापुरुषांच्या चरित्राकडे काहीशा अलिप्तपणे पाहतो. पण त्या पुरुषश्रेष्ठांच्या अंतरंगातून वाहणारे माणूसपणाचे सूक्ष्म, कोमल, मधुर झरे यांविषयी त्याला फारसे कर्तव्य दिसत नाही.
कलासृष्टीचा व्यापार नेमका या उलट आहे. म्हणूनच जिथे इतिहास थांबतो तिथे कलासृष्टीचा शोध सुरू होतो.
छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज शंभूराजे ही मराठी मनांची लाडकी दैवते. पण छत्रपतींच्या जीवनातील शेवटची चार वर्षे न्याहाळत असताना या थोर पितापुत्रांच्या आयुष्यात ज्या घडामोडी घडल्या तिथेच काळपुरुषाने एका महान शोकांतिकेचा घाट निर्माण करून ठेवला आहे असे दिसते; आणि ध्यानात येते की अवतारतुल्य कार्य करणारी पितापुत्रांची ही जोडी म्हणजे अखेर ‘माणसे’च होती.
त्यांच्या व्यक्तिमत्वांतून आणि विविधरंगी कर्तृत्वातून माणूस शोधण्याचा हा एक हृदयस्पर्शी आणि मराठी नाट्यसृष्टीत जवळ जवळ पहिलाच प्रयोग.
marathi natak,raigadala jevha jaag yete,best marathi natak,marathi sangeet natak,full marathi natak raigadala jevha jaag yete,raigadala jevha jaag yete natak 2022,starcast of raigadala jevha jaag yete,best scene from raigadala jevha jaag yete,sangeet natak,marathi drama,marathi natak shambhuraje,itihasik natak,classic marathi natak,marathi natak on shivaji maharaj & sambhaji,marathi superhit natak,new marathi natak,chatrapati shivaji maharaj
#marathinatak #RaigadalaJevhaJaagYete #raigad #chatrapatishivajimaharaj #sambhajimaharaj #shivajiraje #shivajijayanti #shivajimaharajjayanti #sambhajimaharajjayanti #sambhaji_maharaj
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: