ठेच लागली | Thech Lagali Ashi Achanak | Parijaat Marathi Film Song | Whispering Raindrops Films
Автор: Whispering Raindrops Films
Загружено: 2026-01-10
Просмотров: 999
ठेच लागली अशी अचानक..
स्वर : मंगेश पुणेकर
संगीत : ॐकार गोखले
गीत: अमृता नरसाळे
संगीत संयोजन : ॐकार गोखले
मिक्स अँड मास्टर : प्रशांत कांबळे
चित्रपट : पारिजात
ठेच लागली अशी अचानक, अन् हळहळले काही
एक उसासा कोरडा तरी, ओले गहिवर त्याही
भ्रमात धरली खपली पडता, पुन्हा भळाभळ वाही
हृदयाच्या जखमेला या, इलाज कोणता नाही
मुकी जाहली वेदना अन् मुक्या जाणिवा झाल्या,
रित्या ओंजळीत माझ्या सरी धावुनी आल्या,
रक्ताच्या नात्याला परी ना पाझर फुटे जराही..
हृदयाच्या जखमेला या, इलाज कोणता नाही
परकी वाटे सावली कशी, माझी मला कळेना
ओळखीच्या वाटा तरीही, पाऊल तिथे ठरेना
जगणे माझे असे विखुरले, दिशा हरवल्या दाही
हृदयाच्या जखमेला या, इलाज कोणता नाही
अमृता नरसाळे
#nature #moviesoundtrack #konkanpremi #kokan #filmsong #moviesong #marathimusic #music #marathi #filmmusic #marathimulga #marathimulgi #marathikavita #poetry #konkan #marathifilm #marathimovie #marathicinema #soothingmusic #soothingsongs #wrf #parijaat #maharashtra #ratnagiri #sindhudurg #musicvideo
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: