युवा दर्पण लाईव्ह बातमीपत्र:21/1/26; एका ऊसतोड मजूराचा खून तर दोन तरुण अपघातात ठार
Автор: युवा दर्पण लाईव्ह Yuva Darpan Live
Загружено: 2026-01-21
Просмотров: 16337
दिनांक १९/०१/२०२६ सोमवारी सकाळी AHTU च्या प्रभारी अधिकारी, PSI पल्लवी जाधव यांना गुप्त माहिती मिळाली की, दिनांक ०५/०१/२०२६ रोजी आम्ला ता. गेवराई जि. बीड येथे एका १४ वर्षाच्या मुलीचा बालविवाह झाला असून आज सत्यनारायणाची पूजा आहे. त्यावरून, AHTU टीम अम्ला गावात बालविवाह झालेल्या घरी टीम गेली असता,पोलिसांना सर्व पाहुने सैरा वैरा पळू लागले. व मुलीला कुठेतरी लपवून ठेवले. PSI पल्लवी जाधव यांनी मुलीचा घरात व इतरत्र शोध घेतला पण ती मिळून आली नाही. इथे बालविवाह झालाच नाही असा घरातल्या लोकांनी बनाव केला. विवाह झालेला व्यक्ती पळ काढेल तोच त्याला ताब्यात घेऊन PSI पल्लवी जाधव यांच्याकडे लग्न झाल्याचा पुरावा फोटो असल्या चे सांगताच त्याने घाबरून कबुली दिली. सदर व्यक्तीचे नाव कृष्णा उर्फ बबन अनुरुद्र वरबडे वय ३० वर्ष रा. आम्ला ता. गेवराई जि. बीड असे सांगितले. तसेच पिडीत १४ वर्षीय मामाची मुलगी असून एक तासानंतर मुलीला PSI पल्लवी जाधव यांच्या समक्ष हजर केले. सदर मुलगी खूप घाबरलेली होती.तिला विश्वासात घेवून तिचे समुपदेशन केले.त्यांनतर PSI पल्लवी जाधव यांनी गावचे सरपंच व ग्रामसेवक यांना कॉल करून घटनास्थळी बोलावून घेतले व नातेवाईक आणि व ग्रामस्थांना बालविवाहाचे दुष्परिणामाबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर पीडित मुलगी व बालविवाह करणारा कृष्णा उर्फ बबन वरबडे व त्याचे आई वडील यांना पोस्टे ला हजर केले व ग्रामसेवक यांना बालविवाह झालेबाबत गुन्हा दाखल करण्यास सांगितले. तसेच मुलीला तिच्या आईवडिलांसोबत बालकल्याण समिती समोर हजर करणेबाबत सूचना दिल्या. सदर कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नवनीत कावत , अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, यांच्या मार्गदर्शनाखाली, PSI पल्लवी जाधव,उषा चौरे, प्रदीप येवले, अशोक शिंदे , योगेश निर्धार सर्व AHTU बीड यांनी केली
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: