श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र संताजीनगर, धुळे गुरुचरित्र पारायण सोहळा 2025
Автор: Khandeshexplorer
Загружено: 2025-12-06
Просмотров: 244
‼️श्री स्वामी समर्थ‼️
🙏 गेली आठ दिवस श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र *येथे गुरुचरित्र पारायण सोहळा सुरू होता. कसे एक एक दिवस निघून गेले कळले ही नाही,,आज पारायण संपलं… पण मन मात्र अजूनही त्या स्वामी समर्थ सेवा केंद्रातच अडकलंय 🙏
आठ दिवसांचा हा सोहळा…य
किती शांत, किती पवित्र, किती भावपूर्ण!आणि भक्ती मय.
*पहाटेचा तो वेळ…
अजून गावही जागलं नव्हतं,
पण आपण मात्र गजर वाजण्यापूर्वीच जागे…
सकाळच्या गारव्यात
खडबडीत रस्त्याने जाताना होणारा त्रास, मात्र स्वामी सेवे पुढे तो काहीच वाटत नाही,,
सकाळच्या नित्यसूहाकाराच्या हवन व आरती नंतर श्री गुरुचरित्र वाचनासाठी केलेली तयारी,
अंघोळ, चंद्रासारखं थंड पाणी,
हातात गुरुचरित्र, ओठांवर मंत्र…
आणि मन फक्त एका भावनेने ओथंबलेलं—
“आजचं वाचन छान व्हायला हवं.”
त्या भक्तीच्या ओढीने,
त्या धावपळीने,
त्या सततच्या येण्या-जाण्याने
कधी आठ दिवस सरले हेच कळलं नाही.
प्रत्येक दिवस जणू स्वामींच्या चरणी अर्पण केलेल़ एक फुल…
रोज केंद्रात जाण्याची अशी सवय लागली,
की त्या ठिकाणी जाणं म्हणजे घरातल्या देवळात पाऊल टाकल्यासारखी शांती.
केंद्रातील वातावरण,
भजने,
धूपाचा सुगंध,
प्रत्येक सेवकांचे यम चेहरे,
कोणी काही न सांगता मिळणारी साथ—
याच्यातच तर आपण जगत होतो नेमके त्या आठ दिवसांत.
ण
आणि मग अचानक…
पारायण संपलं.
सोहळा सांगता झाला, दिवे मालवले,
लोक हळूहळू परत गेले…
आणि सेवक मात्र उभे राहिले त्या रिकाम्या जागेत.
आणि मनात एकच प्रश्न—
“आता उद्या कुठे जाणार…?
कोणासाठी धावणार…?
कोणासाठी उठणार एवढं लवकर…?”
ज्याचं स्वामी सेवाकेंद्र रोजचं ठिकाण झालं होतं,
जे आठ दिवस आपला श्वास बनलं होतं…
ते अचानक शांत झाल्यावर मनाला कसं करमणार?
करमत नाही… शांत बसवत नाही…
दिवस रिकामा-रिकामा वाटतो…
जणू काही काहीतरी तुटल्यासारखं.
पण हेच खरं—
जिथे मन लावून सेवा केली जाते,
तिथे सेवा संपली की मन रिकामं होणारच…
ही नाराजी नाही…
ही तक्रार नाही…
ही तर शेवटच्या दिवशी श्री स्वामींनी दिलेली प्रेमाची चुटपुट आहे…
जाणवतं की—
“हे दिवस खास होते… आणि पुन्हा येणारही आहेत.”
मन आता जरी हळवं झालं असलं,
तरी अंतर्मनाला माहीत आहे—
सेवा संपत नाही…
ती पुढच्या संधीपर्यंत फक्त थोडी थांबते
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: