अतिवृष्टी मदत: केंद्राला प्रस्तावच नाही? ३१३२ कोटींच्या मदतीवरून संभ्रम | Maharashtra Rain Aid News
Автор: Saam TV News
Загружено: 2025-12-03
Просмотров: 1634
अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीच्या मदतीसाठी राज्य सरकारनं केंद्राला कोणताही प्रस्ताव पाठवला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काल संसदेत दिलेल्या लेखी उत्तरातून ही बाब उघड झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, राज्यात अतिवृष्टीमुळे १४ लाख हेक्टरवर पिकांचं नुकसान झालेलं असताना, केंद्राला केवळ १ लाख १ हजार हेक्टरवर नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली आहे. असं असतानाही, केंद्र सरकारनं राज्याच्या प्रस्तावाची वाट न पाहता ३ हजार १३२ कोटी ८० लाख रुपयांची मदत राज्याला दिली आहे. अतिवृष्टीबाधित क्षेत्राची माहिती देण्यात राज्य सरकारकडून गंभीर चूक झाल्याचं या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. या संपूर्ण प्रकरणावर आणि विरोधकांच्या आरोपांवर स्पष्टीकरण देण्यासाठी राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारची बाजू मांडत विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.
#MaharashtraRain #DattatrayBharane #ShivrajSinghChouhan #FarmersAid #SDRF #SaamTV #MarathiNews #Agriculture #Monsoon2025 #CropDamage #Politics #MaharashtraGovt #LokSabha #HeavyRain #ReliefFund
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: