SHREE SWAMI PATH / श्रीस्वामीपाठ
Автор: shree swamikrupa
Загружено: 2021-04-13
Просмотров: 6898
श्रीस्वामीसमर्थ महाराजांनी, ज्यांना आपले 'सुत' अर्थात 'पुत्र' मानले त्या श्रीस्वामीसुत महाराज यांनी सन १८७१ मध्ये सर्वप्रथम "श्रीस्वामीसमर्थ जयंती उत्सव" सोहळ्याचे भव्य आयोजन केले. या अलौकिक घटनेस यंदाच्या 'श्रीस्वामीसमर्थ जयंती'स १५० वर्षे पूर्ण होत आहेत.
चैत्र शुद्ध द्वितीया, शके १९४३ अर्थात १४ एप्रिल २०२१ हा शुभ दिन यंदा "श्रीस्वामीजयंती" उत्सवाच्या "शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष"पूर्ती म्हणून साजरा होत आहे. या अपूर्व 'श्रीस्वामीयोगा'च्या निमित्ताने, आम्ही श्रीस्वामीसुत महाराज विरचित "श्रीस्वामीपाठ" अतुल खांडेकर यांच्या भावस्पर्शी गायकीच्या माध्यमातून सादर करीत आहोत.
'श्रीस्वामीपाठा'च्या माध्यमातून श्रीस्वामीसुत महाराजांनी ३१ अभंग-रचनांच्या द्वारे ,
श्रीस्वामीसमर्थांचे रूप-गुणवर्णन आणि अवतार माहात्म्य वर्णिलेले आहे.
श्रीस्वामीसुतांना स्फुरलेल्या अभंग-रचना संगीतबद्ध करतेवेळी अतुल खांडेकर यांनी
अहिर-भैरव, यमन-कल्याण, पिलू, पटदीप, पुरिया धनाश्री, मधुवंती, वाचस्पती, केदार, देस,
बैरागी-भैरव आणि भैरवी यासारख्या रागरागिण्यांचा अभंगानुरुप वापर केला आहे.
"श्रीस्वामीकृपा" आणि "पुनर्वसु डिजिटल मिडिया" यांच्या संयुक्त निर्मितीतून साकारलेले,
श्रीस्वामीसुतांचे हे 'प्रासादिक' शब्दसंचित अर्थात जवळपास अडीच तासांचा श्रवणानंद देणारा हा 'श्रीस्वामीपाठ' सर्व स्वामीभक्तांना श्रीस्वामीसमर्थांच्या प्रत्यक्ष अनुभूतीची प्रचिती देईल.
विवेक दिगंबर वैद्य (श्रीस्वामीकृपा)
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: