"निर्धार कसा टिकवावा?"-डॉ नंदू मुलमुले (मनोविकारतज्ञ),
Автор: Dr Dixit Lifestyle
Загружено: 2022-01-15
Просмотров: 67370
९० डेज वेटलॉस चॅलेंज प्रोग्राम मध्ये संडे लेक्चर करिता ह्या वेळेस डॉ . नंदू मुलमुले (मनोविकारतज्ञ ) यांना आमंत्रित केले आहे. परिचय - अंधश्रद्धा निर्मुलन समितीत दहा वर्षे काम, भानामती या मराठवाड्यात आढळणाऱ्या संस्कृतीबंधित मनोविकारांचा वैज्ञानिक अभ्यास आणि त्यावर आधारित शोधनिबंधाचे वॅन्कुवर कॅनडा येथे आंतरराष्ट्रीय परिषदेत वाचन, ग्रामीण भागात बव्हंशी स्त्रियांना होणाऱ्या या विकाराच्या कहाण्या कथन करणारे ‘भानामातीचा भुलभुलैय्या’ या पुस्तकाचे प्रकाशन, हजारो रुग्णांचा यशस्वी उपचार, तणावव्यवस्थापन, व्यक्तिसंवाद विश्लेषण, सुखाचा शोध इत्यादी अनेक विषयांवर शेकडो व्याख्याने अशा उपक्रमाद्वारे त्यांनी मानसिक आरोग्याचा प्रसार केला. ‘मनाचिये गुंती’ या एकपात्री मनोरंजक कार्यक्रमाचे महाराष्ट्रभर सुमारे पाचशे प्रयोग केले. त्यातील शास्त्रीय माहितीवर आधारित पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा वाड़मयपुरस्कारही त्यांना लाभला. 'दुभंगवाणी' हा कवितासंग्रह अशी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. त्यातील 'संभ्रमाचे सांगाती' संग्रहातील कथांवर प्रसिद्ध रंगकर्मी चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित 'मन सुद्ध तुझं' ही एबीपी माझा वाहिनीवरील मालिका लोकप्रिय झाली आहे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: