शितकडा । रॅपलिंग थरार । shitkada rappelling । त्र्यंबकेश्वर । trimbkeshwar। हरिहर गड। harihar fort।
Автор: ऑन दि स्पॉट 🌐
Загружено: 2021-09-09
Просмотров: 625
#शितकडा । #रॅपलिंग थरार । #shitkada rappelling । #त्र्यंबकेश्वर । #trimbkeshwar। #हरिहर गड। #harihar fort
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक तालुक्यात असलेल्या शितकडा धबधबा या अज्ञात सौंदर्याच्या प्रेमात आता पर्यटक पडत असून रविवारी या ठिकाणी आजपर्यंतचा केवळ तिसरी रॅपलिंग मोहीम साजरी करण्यात आली. यावेळी सर्वप्रकारच्या सुरक्षा साधनांचा वापर करून मावळे माऊंटन रेंजर यांनी या मोहिमेचे आयोजन केले होते ज्यात जवळपास 25 जणांनी सहभाग घेतला होता.
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आपल्याला ब्रह्मगिरी (दुर्गभंडार), अंजनेरी, रांजणगिरी, वाघेरा, भास्करगड तसेच सुप्रसिद्ध असलेला हरिहर गड असे अनेक किल्ले पहावयास मिळतात. त्र्यंबकेश्वर तालुक्यात बरेच पर्यटन स्थळ व धबधबे देखील असून अप्रचलित मात्र अत्यंत सुंदर असा शितकडा धबधबा याच भागात पाहायला मिळतो. नाशिक जिल्ह्यापासून 40 किलोमीटर तर वाड्याहून खोडाळा मार्गाने 62 किमी अंतरावर हा धबधबा आहे. हर्षगड, भास्करगड उतवड डोंगर, नागफणी या प्रसिद्ध ठिकाणांच्या पायथ्याशी असूनही आजवर पर्यंत अतिशय कमी पर्यटक व ट्रेकर्स या धबधब्याला भेट देतात.
हर्षगडाच्या बाजूने उंभ्राडे या लोकवस्तीतून खालील भागात शितकडा धबधबा जवळपास 350 फूट खोलवर दिमाखात कोसळतो. रविवारी याठिकाणी मावळे माऊंटन रेंजर यांच्या आयोजनाखाली धबधब्याच्या बाजूला असलेल्या कड्यावरून रॅपलिंग करीत खाली उठरण्याचा थरार अनेकांनी अनुभवला. अतिशय सुरक्षितपणे काळजी घेऊन रॅपलिंगचा चित्तथरारक अनुभव व जंगल ट्रेक भटकंतीचा रोमांचक आनंद जवळपास 25 पर्यटकांनी घेतला. रॅपलिंग सोबत आजूबाजूला पसरलेल्या व धुक्यात हरवलेल्या अनेक किल्ल्यांच्या छायेत असलेल्या या भागात निसर्गाचे अद्भुत रूप अनुभवायला मिळते.
विशेष आभार: गिरीश डेंगाणे, मुकेश नारायण पाटील, आकाश प्रकाश पाटील ( पीक), संदीप( वाडा)
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: