चमचमीत झणझणीत मिसळ l वेगवेगळे दोन वाटण तयार करून नवीन मैत्रिणी तयार केले मिसळ .
Автор: Recipe Show
Загружено: 2024-02-15
Просмотров: 55506
साहित्य :
मटकी उकडण्यासाठी :
मटकी - 1Cup
जिरं - १/२ चमचा
मोहरी - १/२ चमचा
कढीपत्त्याची पाने - १० ते १२
कोथिंबीर - पाव वाटी बारीक चिरून
हळद - १/२ चमचा
आले लसूण पेस्ट - १ मोठा चमचा
कांदा बारीक चिरून - १
मीठ
ओले वाटणासाठी :
कांदा - २ उभे पातळ चिरून
खिसलेले सुके खोबरं - पाव वाटी
आले - 1 इंच
लसूण - १० पाकळ्या
टोमॅटो - 2 मध्यम
कोथिंबीर - १/२ Cup
सुके वाटण :
धने - १ चमचा
जिरे - १/२ चमचा
पांढरे तीळ - 1 चमचा
खसखस - १/२ चमचा
चक्री फुल - १
लवंग - 4 ते ५
काळी मिरी - 4 ते ५
हिरवी वेलची - 2
दालचिनी - 1 इंच
फोडणी साठी :
तेल - पाव वाटी
जिरं - १/२ चमचा
मोहरी - १/२ चमचा
कढीपत्त्याची पाने - १० ते १२
कोथिंबीर - पाव वाटी बारीक चिरून
कांदालसून मसाला - २ चमचे
काश्मिरी लाल मिरची पावडर - २ चमचे
हळद - पाव चमचा
चवीनुसार मीठ
बेसन - २ चमचे
पाव
फरसाण
लिंबु
कृती - प्रथम कुकर मध्ये तेल टाकून त्यात मोहरी जिरं आणि कढीपत्ता टाका एक चमचा आलं लसूण पेस्ट चिरलेला कांदा अर्धा चमचा हळद आणि एक कप मटकी हे दोन मिनिटे परतून घ्या.चवीनुसार मीठ आणि दोन कप पाणी टाकून मटकी शिजवून घ्या.
सुके वाटण करण्यासाठी - एका तव्यामध्ये जिरं चक्रीफुल लवंग काळीमिरी हिरवी वेलची दालचिनी हे खडे मसाले एकत्र भाजून घ्या त्यात एक चमचा धने किसलेले खोबरे टाका व त्यानंतर अर्धा चमचा खसखस आणि पांढरे तीळ एक चमचा टाकून भाजून घ्या.
ओलं वाटण करण्यासाठी -दोन कांदे पातळ उभे चिरलेले तव्यामध्ये थोडं तेल टाकून भाजून घ्या त्यात लसूण आणि आलं टाका छान परतून घ्या आणि त्यामध्ये चिरलेले दोन टोमॅटो टाकून भाजून घ्या.आता सुख वाटण आधी मिक्सर मधून बारीक करून घ्या व त्यानंतर ओलं वाटण आणि कोथिंबीर टाका दोन्ही वाटण एकत्र करून बारीक करून घ्या कढई तापवून त्यात तेल गरम झाले की त्यात जिरं कढीपत्ता आणि तयार केलेला वाटण दोन मिनिटं परतून घ्या मसाल्याच्या बाजूलाच दोन चमचे बेसन भाजून एकजीव करा . आता त्यात कांदा लसूण मसाला काश्मिरी लाल मिरची पावडर दोन चमचे आणि उकडलेली मटकी टाका तीन ग्लास पाणी कोमट करून टाका आणि एक उकळी काढून घ्या.छान सर्व्ह करून घ्या...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: