रामराजेंच्या टिकेला रणजिदादांचे सडेतोड उत्तर | राजकारण तापलं
Автор: Sthairya
Загружено: 2025-12-14
Просмотров: 12343
विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सभेतून केलेल्या टीकेला माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जोरदार आणि सडेतोड उत्तर दिले आहे. या व्हिडिओत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रामराजेंवर अनेक गंभीर आरोप करत स्पष्ट भूमिका मांडली आहे.
रामराजे हे भीती दाखवण्याचे राजकारण करतात, मात्र आता जनता आणि कार्यकर्ते घाबरणार नाहीत, असे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच रामराजे कला क्षेत्रात गेले असते तर मोठे नाव कमावले असते, असा टोला त्यांनी लगावला. कार्यकर्त्यांना वापरून नंतर फेकून देण्याची सवय असल्याचा आरोप करत, दीपक चव्हाण यांच्या आमदारकीच्या वेळी रामराजे बाहेर पडले नाहीत, पण स्वतःच्या मुलासाठी रस्त्यावर उतरले, हे उदाहरण त्यांनी दिले.
याशिवाय त्यांच्या गटातील अनेक नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक आता भाजपसोबत गेल्याचा दावा करत, आगामी निवडणुकीत त्यांच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
संपूर्ण राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.
अशाच स्थानिक, विश्वासार्ह आणि थेट बातम्यांसाठी दैनिक स्थैर्यला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि आपले मत कमेंटमध्ये मांडा.
#स्थैर्य #फलटण #मराठीन्युज #रामराजेनाईकनिंबाळकर #रणजितसिंहनिंबाळकर #स्थानिकराजकारण #भाजपा
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: