तूर खोडवा नियोजन | tur khodwa niyojan | hiwali tur lagwad |
Автор: BharatAgri Marathi
Загружено: 2023-12-25
Просмотров: 31871
▶️ व्हिडीओमध्ये दिलेली कृषी उत्पादने खरेदी करण्यासाठी आता खाली दिलेल्या 👇🏼 लिंकवर क्लिक करा आणि 🥳 100% कॅशबॅकसह उत्पादन घरपोच मिळवा! 📢 कॅश ऑन डिलिव्हरी सुविधादेखील उपलब्ध!
👉लिंक - https://krushidukan.bharatagri.com/
====================================================================
👨🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏
🌱 भारतअॅग्री मध्ये आपले स्वागत आहे.
आजचा विषय - 🌱तूर खोडवा नियोजन | tur khodwa niyojan | hiwali tur lagwad | #tur #redgram #farming #agriculture👍
👉तूर काढणीच्या १५ दिवस आधी पाणी बंद करावे. पाणी बंद केल्याने झाडास ताण बसतो.
👉पानगळ करण्यासाठी काढणीच्या ८ दिवस आधी बायर चे इथ्रेल १ मिली + ०० ५२ ३४ - ५ ग्राम प्रति लिटर पाणी फवारणी करायची आहे. हि फवारणी केल्याने पानांमधील अन्नद्रव्ये फांद्यांमध्ये येते. हे साठवलेले अन्नद्रव्य नवीन फांदी किंवा पान निघण्यासाठी महत्वाचे ठरते.
👉इथ्रेल ची फवारणी करताना काही ठिकाणी रोगात फांद्या असलतील तर टाटा मास्टर २ ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
👉पानगळ झाल्यानंतर फक्त वरचे वर शेंड्याची छाटणी करावी. बरेच शेतकरी छाटणी बुडापासून किंवा जमिनीपासून वर २ ते ३ फुटावर करताना हि पद्धत चुकीची आहे. याने फांद्या येण्यासाठी वेळ लागतो.
👉नंतर शेतीमध्ये मशागत करून घ्यावी. २४ २४ ०० हे खत किंवा २० २० ०० १३ हे खत १ बॅग (५० किलो) प्रति एकरी देऊन ठिबक असल्यास ठिबकने किंवा पाटपाण्याने पाणी द्यावे. या पाण्यासोबत बिग पॉवर २०० ग्राम + ट्रायकोडर्मा व्हिरीडी १ लिटर प्रति एकरी द्यावे.
👉ड्रीप मधून खालील पद्धतीने खत नियोजन करावे -
1. फांद्या आणि पाने फुटू लागताच १९ १९ १९ - ३ किलो प्रति एकरी २ ते ३ वेळा द्यावे.
2. फुल अवस्थेमध्ये १२ ६१ ०० किंवा ०० ५२ ३४ - ३ किलो प्रति एकरी २ ते ३ वेळा द्यावे.
3. शेंगा लागण्यानंतर १३ ०० ४५ - ३ किलो प्रति एकरी २ ते ३ वेळा द्यावे.
4. पक्वता अवस्थेमध्ये ०० ०० ५० - ३ किलो प्रति एकरी द्यावे.
👉फांद्या फुटल्यानंतर १९ १९ १९ - ५० ग्राम + IFC स्कुबा २५ मिली प्रति १५ लिटर पंप फवारणी करावी आणि आवश्यकतेनुसार बुरशीनाशक किंवा कीडनाशक मिसळावे.
👉फुल अवस्थेनंतर मोकन म्हणजेच शेंग माशीचा प्रधुरभाव झाल्यास कोराजन ६ मिली + ०० ५२ ३४ - ५ ग्राम + स्टिकर २ मिली प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
👉शेंगा भरत असताना शेंगा पोखरणाऱ्या अळीसाठी पुन्हा धानुका इ एम १ - १० ग्राम + ०० ०० ५० - ५ ग्राम + स्टिकर २ मिली प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
👉अशा पद्धतीने नियोजन केल्यास नक्कीच तुरीचा खोडवा फायदेशीर ठरेल.
तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍
✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -
👉भारतअॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम मराठी - https://bit.ly/3B9Ny8G
👉इंस्टाग्राम हिन्दी - https://bit.ly/45XAj88
👉वेबसाइट - https://krushidukan.bharatagri.com/
👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z
👉भारतअॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt
👉भारतअॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF
#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: