Foody Ashish | Veg Puff | Tasty Veg Patties in Pune | खारी पॅटिस | Patties Recipe | Veg Puff Recipe
Автор: Lawangi Mirchi
Загружено: 2021-09-20
Просмотров: 18670
पुण्याच्या मध्यभागातील पेठांमध्ये राहणाऱ्या जवळपास प्रत्येकाची रविवार सकाळ सुरू होते फ्रेश खारी पॅटिस खाऊन. पुण्यातील सदाशिव, शनिवार, नारायण, नवी पेठ या भागात राहणारे पुणेकर रविवारी सकाळी नित्यनेमाने वेगवेगळ्या बेकऱ्यांमध्ये जाऊन खारी पॅटिस आणतात आणि घरच्यांसोबत त्याची चव चाखतात. खारी पॅटिस मिळणाऱ्या विविध प्रसिद्ध बेकऱ्या पुण्यात आहेत. पण यामध्ये आता एक नवे नाव जोडले गेले आहे. ते म्हणजे सदाशिव पेठेतीलच द बेक स्टोअर ही बेकरी. या बेकरीमध्ये एकदम चवदार खारी पॅटिस रोज मिळतात. या पॅटिसचा आकार आणि टेस्ट दोन्हीही इतर ठिकाणी मिळणाऱ्या पॅटिसपेक्षा वेगळी आहे. या बेकरीत मिळणाऱ्या पॅटिसने अल्पावधीत अनेक पुणेकरांना आपलेसे केले. फूडी आशिषही या बेकरीत मिळणाऱ्या पॅटिसच्या प्रेमात पडला आहे. दर रविवारी पॅटिस खाणे हे फूडी आशिषचे व्रतच आहे. शक्यतो खंड न पडू देता हे व्रत गेल्या तीन दशकांपासून तो करतो आहे. बेकरी बदलते पण रविवारी पॅटिस खाणे फूडी आशिष अजिबात सोडत नाही. खारी पॅटिसबद्दल आणखी माहिती करून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा.
veg puff,veg puff recipe,aloo patties recipe,veg aloo puff,potato patties recipe,eggless veg puff recipe,bakery veg puff recipe,easy veg. puff recipe,veg puff oven recipe,पेटीज बनाने की विधि,bakery style puff recipe,potato patties recipe in marathi,आलू पेटीज बनाने की विधि,aloo puff masala recipe,best veg puff recipe,indian veg puff recipe,bakery style patties,aloo patties,potato patties
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: