ज्ञानोबा नावाचा महान अवलिया - प्रेरणात्मक गीत | बापूसाहेब दगडे पाटील
Автор: kusti mallavidya
Загружено: 2025-09-19
Просмотров: 735
कै.ज्ञानोबा दगडे पाटील...बावधन पुणे येथे गेली अनेक दिवस कीर्तन महोत्सव सुरू आहे तो ज्ञानोबा दगडे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त... आमचे परममित्र बंधू मार्गदर्शक पै.बापूसाहेब दगडे पाटील यांचे ते पिताश्री.बापूसाहेब यांचे मी नेहमी स्टेटस पाहतो आणि अंतर्मुख होतो कारण आजच्या युगात दररोज 365 दिवस आपल्या कैलासवासी पित्याची आठवण काढणारा मुलगा शोधून सापडणे मुश्किल.पण बापूसाहेब नित्यनियमाने जणू रोजची पूजा असल्यासारखे त्यांचे स्टेटस ठेवतात.यावर्षी त्यांचे पिताश्री जाऊन एक वर्ष झाले.पुण्यातील किंबहुना भारतातील सर्वात मोठा कीर्तन महोत्सव त्यांनी त्यानिमित्त बावधन येथे भरवला आहे.त्यांच्या वडिलांच्या विषयी असणाऱ्या भावना मी गीतरुपी शब्दबद्ध करुन त्याचे एक सुंदर गीत बनवले.मनात शंकाच होती की बापूसाहेबांच्या मनातील भावना अचूक लिहता येतील का.पण,आज त्यांनी त्या गीतापासून विडिओ पाठवला तेव्हा आपसूक डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या.आईवेडे अनेक अवलीये पाहिले,पण बापवेडा असणारा हा अवलिया प्रथमच... आपणही हे गीत पाहून जरूर प्रतिक्रिया कळवा.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: