Pune To Narsobawadi I Road Conditions I Pune To Karad & Sangli To Islampur I पुणे ते नरसोबावाडी I
Автор: Explore With Carlekar
Загружено: 2024-07-20
Просмотров: 5205
नमस्कार मंडळी..
आज मी आणि अतुल दादा निघालो आहोत श्री क्षेत्र नृसिंहवाडी ला जाण्यासाठी..
मागील वेळी आम्ही जेव्हा वाडी ला गेलो होतो तेव्हा आम्ही पुणे सातारा रहिमतपूर पपुसैसावली विटा मार्गे मिरज आणि तिथून पुढे वाडी ला गेलो होतो कारण पुणे बंगलोर महामार्गावर सध्या सातारा च्या पुढे राष्ट्रिय महामार्गावर खूप मोठ्या प्रमाणात रस्ता रुंदीकरणाची कामे सुरू आहेत आणि त्यात प्रामुख्याने कराड येथे जो पूर्वी पुल होता तो पाडण्यात आला आहे त्यामुळे ह्या संपूर्ण भागात खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असे आणि ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आम्ही सातारा रहिमतपूर मर्गे नरसोबा वाडीला आलो होतो,आता ह्या प्रवासाला साधारण दोन महिने उलटून गेले आहेत त्यामुळे ह्या दोन महिन्यात पुणे बंगलोर महामार्गावर किति प्रमाणात कामे झाली आहेत,किती काम शिल्लक आहेत हे पाहण्यासाठी आम्ही आज पुणे ते नरसोबच्या वाडीला, पुणे बंगलोर महामार्गाने जायचे ठरवले आहे ..
आज सकाळी सहा वाजता आम्ही पुणे सोडले आणि साधारण साडेसहा वाजता आम्ही खेड शिवापुर चा टोल नाका ओलांडून पुढे निघालो..आमचा प्रवास छान सुरू झाला आणि साधारण एका तासात आम्ही खंबाटकी घाट ओलांडून पुढे निघालो.. आणेवडी टोल नका पार केला तेव्हा सव्वासात वाजले होते आणि तिथून पुढच्या पंधरा वीस मिनिटात आम्ही सातारा शहर ओलांडून पलीकडे आलो ते अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या जवळ..
मित्रांनो इथपर्यंत आपला प्रवास हा छान आणि व्यवस्थित होतो कारण पुणे ते सातारा पर्यंत संपूर्ण रस्ता नीट नेटका आहे आणि आपला प्रवास व्यवस्थित होतो..पण... अजिंक्यतारा कारखाना ओलांडून आपण पुढे आलो की मग रस्ता अचानक चारपदरी होतो..पण हे रुंदीकरण अल्प अवधी पुरतेच आपल्याला लाभते,कारण इथुन कराड शहरापर्यंत संपुर्ण महामार्गावर खूप ठिकाणी कामे सुरू आहेत आणि त्यामुळे कधी आपल्या रस्त्याच्या डाव्या बाजूने तर कधी रस्त्याच्या खाली उतरून गाडी चालवावी लागते..
सातारा ते कराड हे अंतर 65/70 किलोमिटर इतके आहे आणि आता ह्या साठी आम्हाला दीड तास लागला होता .सकाळी वर्दळ कमी होती तरी पण इतका वेळ लागला,जर वर्दळीच्या वेळेत आम्ही प्रवास केला असता तर कदाचित ह्या ही पेक्षा जास्त वेळ लागला असता..
कराड मधे हॉटेल संगम येथे आम्ही नाष्टा करण्यासाठी थांबलो, नाष्टा केला आणि मग तिथून बाहेर पडलो..
आता साधारण 8.50 वाजले होते आणि आम्ही निघालो पेठ नाक्याच्या इथे ..जिथून आम्हाला आज इस्लामपूर मार्गे औदुंबर ला जायचे होते ..
मित्रांनो कराड शहराचा जो मोठा पुल पाडण्यात आला आहे त्या पुलाचे काम खूप वेगात सुसर असून आज आम्हाला पुलाचे बरेच काम साधारण 50% ते 60% झाल्याचे आढळून आले त्यामुळे आम्ही कराड मधून खूप लवकर बाहेर पडलो..
साधारण अर्ध्या तासाने आम्ही पेठनाक्या पशी आलो..इथुन आपल्याला बंगलोर महामार्ग सोडावा लागतो आणि आपण डाव्या रस्त्याने जातो जिथे पुढे ऐक चौक आहे त्या चौकातून डाव्या हाताला आपण वळतो ते इस्लामपूर च्या दिशेला. पेठनाका ते इस्लामपूर हे अंतर साधारण 7/8किलोमीटर आहे पण हा रस्ता छोटा आणि एक पदरी असल्यामुळे वर्दळीच्या वेळी हे अंतर पार करायला बऱ्यापैकी वेळ लागतो आम्ही मात्र तसे वेळेत होतो त्यामुळे आम्हाला वेळ लागला नाही..
मित्रांनो इस्लामपूर ते सांगली हा मार्ग आता चौपदरी होणार आहे असे मला इथे समजले,अंज त्यामुळे ह्या रस्त्यावर पण रुंदीकरणाच्या कामांना सर्वात झालीं आहे त्यामूळे हा मार्ग आता खडबडीत आहे आणि ह्यावरून प्रवास करताना आपल्याला गाडी जपून चालवायची आहे..साधारण पाऊण तासात आम्ही आलो ते आष्टा शहराच्या अलीकडे,इथुन आपल्याला डाव्या हाताला वळायचे आहे ते भिलवडीच्या दिशेला..हा रस्ता आहे तासगाव आष्टा रस्ता आणि हा रस्ता खूप उत्तम आहे मोठा आणि डांबरी रस्ता आहे आणि इथुन 120 किलोमिटर अंतरावर औदुंबर आहे जे आपण पांधरा ते वीस मिनिटात पोहोचतो..
आम्ही पण औदुंबर मधे पंधरा मिनिटात पोहोचलो होतो..गाडी लावली आणि थेट देवळात गेलो ..दर्शन घेतले आणि औदुंबर मधून आमचा प्रवा सुरू झाला तो सांगली शहराच्या दिशेने ..साधारण अर्ध्या ते पाऊण तासात आम्ही सांगली शहरात दाखल झाली आणि मग सांगली एसटी स्टँड क्या शेजारून जाणाऱ्या रस्त्याने आम्ही गेलो ते शिरोळ मधे आणि तिथून थेट नरसोबाची वाडी येथे पोहोचलो..
मला वाटतंय की आपण जर प्रवास करणार असाल तर पुणे बंगळूर मार्गाने न येतं आपण पुणे सातारा रहिमतपूर विटा मार्गे मिरज आणि तिथून नरसोबाच्या वाडीला यावे जेणे करून आपल्या वेळेची आणि पैश्यांची बचत होईल
ह्या मार्गानें येण्याचे दोन कारणे आहेत..ऐक म्हणजे पुणे बंगलोर महामार्गावर सध्याच्या प्रमाणात कामे सुरू आहेत ते पाहता संपुर्ण रस्ता तयार होण्यास अजून बराच वेळ लागणार आहे आणि दुसरे कारण म्हणजे जरी महामार्गाचे काम वेळेत झाले तरी आता पेठ नका ते सांगली हा रस्ता चारपदरी होण्यासाठीचआता कमीत कमी दोन वर्षे तरी लागतील असे वाटतंय
म्हणून येत्या नजीकच्या काळात औदुंबर आणि नरसोबाच्या वाडीला यायचे असेल तर पुणे सातारा रहिमतपूर पुसेसावळी विटा तासगांव हाच मार्ग मला तरी योग्य वाटत आहे .
धन्यवाद..
#श्रीक्षेत्रऔदुंबर #श्रीक्षेत्रनरसोबाचीवाडी ##पुणेतेभिलवडी #पुणेतेतासगाव #पुणेतेकराड #पुणेतेइस्लामपूर #पुणेतेआष्टा #पुणेतेसांगली #पुणेतेशिरोळ #पुणेबंगलोरमहामार्गाचीपरिस्थिती
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: