ठेवा शिरी हात Theva Shiri Haat by Yogesh Tapasvi योगेश तपस्वी
Автор: Yogesh Tapasvi
Загружено: 2023-08-10
Просмотров: 16175
एकच इच्छा मनात माझ्या असते दिनरात
प्रेमाने गुरुराया ठेवा माझ्या शिरी हात
तान्ह्या बाळा जशी माऊली, ध्यास तसा लागावा
ओठी असावे नाम, चेहरा तुझाच सतत दिसावा
तव चरणांशी स्वर्ग सारी तीर्थे तुझ्या मठात
प्रेमाने गुरुराया ठेवा माझ्या शिरी हात
असे करा की विवेक जागृत मनात नित्य असावा
सचोटीचा,सन्मार्गाचा पथ मजला सहज दिसावा
सदैव असू दे मनात प्रीती,धर्म, नीती दिन रात
प्रेमाने गुरुराया ठेवा माझ्या शिरी हात
प्रारब्ध कुणाला चुकले नाही आजवरी या जगती
मला न त्याची भीती असता सद्गुरु मम सांगाती
भक्तोध्दारा शंकर बाबा बसले धनकवडीत
प्रेमाने गुरुराया ठेवा माझ्या शिरी हात
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: