मालेगाव - डोंगराळे अत्याचार प्रकरणी सर्व समाजातून आक्रोश वकील संघ ही आरोपी विरुद्ध l SHARP NEWS l
Автор: SHARP NEWS MALEGAON
Загружено: 2025-11-19
Просмотров: 29081
सर्व समविचारी पुरोगामी संघटनांतर्फे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा
मालेगाव शहर,ता.१८:
डोंगराळे (ता. मालेगांव) येथील निरागस बालिकेवर एका नराधमाने अत्याचार करून तिची निघृण हत्या केली. या गुन्ह्यामुळे मालेगांव तालुक्यातील जनतेत संतापाची तीव्र लाट उसळली असून या गुन्ह्यातील आरोपीला कठोरतम म्हणजे फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी लोकांची भावना आहे.या घटनेचा शहरातील समविचारी व पुरोगामी संघटनांतर्फे महात्मा गांधी पुतळ्याजवळ एकत्र येऊन तीव्र निषेध व्यक्त करून आंदोलन करण्यात आले. यावेळी शहर व ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने मुलींसह साथी प्रतिष्ठान, राष्ट्र सेवा दल, मराठा सेवा संघ, मराठा महासंघ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्यासह समविचारी पुरोगामी संघटनांचे पदाधिकारी यांनी निषेध फलक हातात घेऊन आंदोलन केले. यावेळी साथी प्रतिष्ठानचे राजेंद्र भोसले, रोहिदास उशिरे,अजय शहा,मराठा सेवा संघाचे प्रा जगदीश खैरनार,मराठी साहित्यिकांतर्फे रमेश पवार, मराठा महासंघातर्फे अमोल निकम, संजय महाले आदींनी निषेध व्यक्त करणारे भाष्य केले. यानंतर मोठ्या संख्येने 'नराधमाला फाशी द्या' अशा विविध घोषणा देत कॅम्प रस्त्याने मोर्चा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. या ठिकाणी अनेक शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थीनींनी संतप्त भावना व्यक्त करून आम्ही घरून बाहेर पडत असताना जग सुरक्षित आहे का? अशा नराधमांना तातडीने न्यायालय बसवून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार यांना मोर्चेकऱ्यांतील मुलींनी निवेदन दिले. समस्त नागरीक व सर्व सामाजिक संघटना यांच्यातर्फे या गुन्हयाचा तपास युध्द पातळीवर पूर्ण करण्यात येऊन कोणत्याही प्रकारच्या त्रुटी न ठेवता तपास यंत्रणांनी गुन्हेगाराला मृत्यूदंडाची शिक्षा मिळावी असे या निवेदनात नमूद केले आहे.
यावेळी साथी प्रतिष्ठानचे सुभाष परदेशी,राजेंद्र भोसले, किशोर इंगळे,उमेश अस्मर, डॉ सुगन बरंठ, ॲड. भास्कर तिवारी, राष्ट्र सेवा दलाचे नचिकेत कोळपकर,शाहिर आघाडीचे प्रकाश वाघ,शाम शिंपी,सागर पाटील, प्रविण वाणी, रवींद्र अहिरे,संजय महाले, योगेश कळमकर,गौरव शेलार,मयुर वांद्रे, बळवंत अहिरे, अनिल निकम यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
मालेगाव शहर:
नराधमाला लवकरात लवकर फाशी हिच कु. यज्ञाला खरी श्रध्दांजली ठरेल.
मालेगाव (प्रतिनिधी- संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी व मानवतेला काळीमा फासणारी घटना मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे घडली.
छायाचित्कार जगदीश सोनार याच्या ४ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करुन तिला दगडाने ठार केले.
हे अमानुष कृत्य करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि त्यासाठी ही केस सामाजिक बांधिलकी म्हणून फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी याचे निवेदन अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, अपर पोलीस अधिक्षक संधू यांना मालेगाव तालुका फोटोग्राफर असोशीयशनच्या वतीने देण्यात आले.
तसेच या गुन्ह्यातील आरोपीचे वकीलपत्र कोणीही घेऊ नये, अशा आशयाचेही निवेदन मालेगाव वकील संघास देण्यात आले, यावेळी वकील संघास उपाध्यक्ष अॅड मलिक शेख, सचिन अॅड नीलेश पाटील, अॅड किशोर त्रिभुवन यांनी निवेदन स्वीकारले.
यावेळी मालेगाव छायाचित्रकार संघटनेचे अध्यक्ष तुषार जाधव, सचिव गोकुळ दुसाने यांचेसह पदाधिकारी व सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.
ll SHARP NEWS MALEGAON ll
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: