घाटंजीच्या इतिहासात सर्वात मोठा आदिवासी समाजाचा आक्रोश मोर्चा | GhatanjiNews
Автор: News29Maharashtra
Загружено: 2025-09-23
Просмотров: 49739
घाटंजी : तालुक्यातील आदिवासी समाजाने दि. २३ सप्टेंबर रोजी शिवाजी चौक ते तहसील कार्यालय पर्यंत "आदिवासींचा आक्रोश" मोर्चा काढून राज्य शासनाला ठाम इशारा दिला. मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झालेल्या या मोर्च्यात “बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश हा ऐतिहासिक व घटनात्मक दृष्ट्या अन्यायकारक आहे” अशी भूमिका स्पष्ट करण्यात आली.
आदिवासी नेत्यांनी सांगितले की, १९५० मध्ये संविधानातील अनुच्छेद ३४२ नुसार अनुसूचित जमातींची यादी अधिसूचित करण्यात आली, परंतु त्यामध्ये बंजारा समाजाचा उल्लेख नाही. इतिहास संशोधकांच्या अहवालांनुसार बंजारा समाज हा प्रामुख्याने भटक्या व्यापारी व वाहतूकदार समुदाय असून, १९८१ साली केंद्र शासनानेही ते अनुसूचित जमातीत समावेशाच्या निकषांना पात्र नसल्याचे स्पष्ट केले होते.
हैदराबाद गॅझेटचा दाखला देत काही आमदारांनी बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्याची मागणी केली असली, तरी ती वस्तुनिष्ठदृष्ट्या चुकीची असल्याचे आदिवासी समाजाने नमूद केले. या निर्णयामुळे मूळ आदिवासींच्या अधिकारांवर गदा येणार असल्याने त्याचा तीव्र विरोध करण्यात आला.
मोर्चात ठाम इशारा देण्यात आला की, शासनाने बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याचा प्रयत्न केल्यास राज्यभर उग्र आंदोलन उभारले जाईल.
यावेळी आक्रोश मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये होऊन या सभेचे सूत्रसंचालन कैलास कोरवते यांनी केले तर
रमेश धुर्वे ,माणिकराव मेश्राम , होमदेव कनाके ,
विजय कनाके,
संदीप कौवे ,आकाश आत्राम, मोतीरावन कनाके , दिलीप शेडमाके, अनिल किनाके, राजू चांदेकर ,व आमदार राजूभाऊ तोडसाम यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अजय आत्राम यांनी केले. आक्रोश मोर्चा यशस्वी करण्यासाठी सकल आदिवासी समाजातील सर्व घटकांनी अथक परिश्रम घेतले.
#आदिवासी #आदिवासीआरक्षण #बंजारासमाज #मराठीताज्याबातम्या #adivasi #गोंड #आदिवासी #ghatanji #ghatanjinews #yavatmal #यवतमाळ #maharashtra #abpmajhavideos #abpmajha #news29maharashtra #maharashtra #marathinews #न्यूज२९महाराष्ट्र #ghatanji #maharashtranews #मराठी #घाटंजी #मराठीताज्याबातम्या
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: