Ahilyadevi High School for Girls Republic Day,हा देश सार्वभौम राखणं हे आपलं कर्तव्यआहे डॉ संजय तांबट
Автор: kasturi communication
Загружено: 2024-02-03
Просмотров: 2645
"आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून आपला भव्य दिव्य भारत साकार होणार आहे ,
आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवींची गौरवशाली परंपरा असलेल्या अहिल्यादेवी शाळेत शिकतो, .
हा देश सार्वभौम राखणं हे आपलं कर्तव्य आहे .
पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या माहूत पार्वती बारकेट
यांचे उदाहरण देऊन स्त्रिया सुद्धा सर्व क्षेत्रात प्रगती करू शकतात प्रगतीचे क्षितीज समोरच आहे
. अवकाशात झेप घ्या आणि प्रगती करा ." असा संदेश प्रजासत्ताक दिनानिमित्त
स्वरूपवर्धिनी संस्थेचे विद्यमान कार्याध्यक्षआणि पुणे
विद्यापीठाचे वृत्तपत्रकारिता विभाग प्रमुख डॉ.संजय तांबट यांनी दिला.
शाळा समिती अध्यक्षा डॉ. प्रीती अभ्यंकर
यांनी विद्यार्थिनींना बघणे आणि डोळे उघडे ठेवून पाहणे यातील फरक स्पष्ट केला
आणि आजूबाजूच्या घटनांकडे आपण सजग राहून कसे पाहिले पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले.
डॉ. अभ्यंकर आपल्या भाषणात म्हणाल्या, "रोज दोन चांगल्या गोष्टी पाहून त्या वहीत नमूद करा आणि
महिन्याच्या शेवटी त्याचा आढावा घ्या यातून आपलीच आपल्याला एक चांगली ओळख होते."
75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शाळेतील काही
विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीतांचे, नृत्याचे सादरीकरण केले.
यावेळी व्यासपीठावर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.अनघा डांगे
आणि पर्यवेक्षिका श्रीम. चारुता प्रभुदेसाई उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, पाहुण्यांचा परिचय आणि
आभार प्रदर्शन श्रीम. दीपाली थोरात आणि श्रीम. स्नेहल गुंजाळ यांनी केले.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: