छत्रपती शिवाजी महाराज निघाले केदारनाथ दर्शनाला | Kedarnath Dham | Pune to Kedarnath on bike Part 4
Автор: Sanju Ram Vlogs
Загружено: 2025-07-11
Просмотров: 224
पंच केदार तीर्थ
1. केदारनाथ
2. मध्यमेश्र्वर
3. तुंगनाथ
4. रुद्रनाथ
5. कल्पेश्वर
उत्तराखंड राज्यातील केदारनाथ गावात मंदाकिनी नदीच्या काठावर केदारनाथ मंदिर बांधण्यात आले आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक, पंचकेदार व छोटा धाम या अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्रांपैकी केदारनाथ एक मानले जाते. हिमालय पर्वतांमध्ये असलेल्या केदारनाथ मंदिराची उभारणी पांडवांनी केली असून, आद्य शंकराचार्यांनी या मंदिराचे पुनरुज्जीवन केले, अशी मान्यता आहे. गौरीकुंडहून 14 कि.मी. अंतराचा खडतर प्रवास करूनच केदारनाथ मंदिरापर्यंत पोहोचता येते आणि केदारनाथांचे दर्शन घेता येते. २०१३ साली उत्तराखंडमध्ये आलेल्या विध्वंसक पुरामध्ये केदारनाथ गाव पूर्णपणे वाहून गेले. मात्र, दगडी केदारनाथ मंदिराला किंचितसा धक्काही पोचला नाही, हे आपण सर्वांनीच पाहिले. सहा महिने हे मंदिर पूर्ण बर्फाच्छादित असते. अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर किंवा त्या आसपास हे मंदिर भाविकांसाठी खुले केले जाते. केवळ सहा महिने हे मंदिर भाविकांसाठी खुले असते. केदारनाथ मंदिर हे दररोजच्या पूजा-अर्चेसाठी खुले करण्यात आले असून, मोजक्या लोकांना येथे प्रवेश देण्यात आला आहे. केदारनाथ मंदिर पाच भागात विभागले गेले असल्याचे सांगितले जाते.
Main story
महादेव शिवशंकराचे दर्शन घेण्यासाठी पांडव हिमालयात गेले. मात्र, शिवशंकर त्यांना दर्शन देण्यास इच्छुक नव्हते. पांडवांना समजू नये, यासाठी त्यांनी वृषभ रुप धारण केले आणि प्राण्यांच्या एका कळपात सहभागी झाले. भीमाला ही गोष्ट समजली. त्याने विशालकाय देह धारण केला. तेव्हा अन्य प्राणी भीमाच्या दोन पायांमधून निघून गेले. मात्र, शिवनाथ तेथेच राहिले. तेव्हा भीमाने वृषभाच्या पाठीवरील वशिंड धरले. पांडवांचा दृढ संकल्प पाहून शिवशंकरांनी आपला निश्चय बदलला आणि पांडवांना त्यांनी दर्शन दिले. पांडवांना त्यांच्या सर्व पापांतून मुक्ती मिळाली. वृषभाच्या पाठीवरील वशिंडाच्या आकारात असलेल्या शिवलिंगाची पूजा केदारनाथ
केदारनाथ मंदिर कसे जायचे
राष्ट्रीय महामार्ग 109 रुद्रप्रयाग आणि केदारनाथला जोडतो, गौरीकुंड हे ऋषिकेश, चमोली, उत्तरकाशी, डेहराडून, हरिद्वार, पौरी, श्रीनगर, टिहरी इत्यादी सर्व जवळच्या शहरांना रस्त्याने जोडलेले आहे. तुम्ही दिल्लीच्या ISBT कश्मीरी गेटवरून श्रीनगर आणि ऋषिकेशला बसने जाऊ शकता. उत्तराखंडमधील प्रमुख ठिकाणांहून टॅक्सी आणि बसेस देखील भाड्याने घेतल्या जाऊ शकतात.
बद्रीनाथ पासून जवळचे रेल्वे स्टेशन ऋषिकेश आहे जे केदारनाथ पासून 216 किमी अंतरावर आहे. हे भारतातील प्रमुख गंतव्यस्थानांशी वारंवार येणा-या गाड्यांद्वारे जोडलेले आहे. तुम्ही रेल्वे स्टेशनवरून टॅक्सी किंवा बसने गौरीकुंडला पोहोचू शकता.
गौरीकुंडला सर्वात जवळचे विमानतळ जॉली ग्रांट विमानतळ आहे, तेथून तुम्ही गौरीकुंडला टॅक्सीने जाऊ शकता. गौरीकुंडहून केदारनाथला जाण्यासाठी तुम्हाला 16 किलोमीटरचा ट्रेक करावा लागेल ज्यामध्ये तुम्ही घोडा/पालकी देखील चालवू शकता. जर तुम्हाला ट्रेकिंगला जायचे नसेल तर तुम्ही डेहराडूनमध्ये उपलब्ध असलेल्या हेलिकॉप्टर सेवा वापरू शकता
------------
#kedarnath #kedarnathtemple #kedarnathdham #kedarnathdham2025
------------
Pune to Kedarnath
Part1
• Pune to kedarnath Journey on bike | पुणे त...
Part2
• Pune to Kedarnath Journey on bike part 2| ...
part3
• सोनप्रयाग ते केदारनाथ | Pune to Kedarnath ...
======================
Follow us on
Instagram - https://www.instagram.com/sanju_ram_v...
Youtube - / @sanjuramvlogs
Facebook - https://www.facebook.com/share/15f5WB...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: