सप्तम रुद्राभिषेक 19/09/2025
Автор: Rudra Anushthan 2025
Загружено: 2025-12-05
Просмотров: 30
नमस्कार आपल्या रुद्रहृदयोपनिषद ग्रंथाच्या मार्गदर्शनाप्रमाणे व आपणा सर्व भाविकांच्या सहकार्याने सुरु असलेले सामुहिक रुद्राभिषेक अनुष्ठानातील सप्तम (सातवी) शिवरात्र दिनांक 19/09/2025 रोजी असून सायंकाळी 5.30 ते 6.30 च्या दरम्यान रुद्राभिषेकास सुरुवात होईल. ही शिवरात्र पितृपक्षातील असून आपल्या वरील ग्रंथाच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपले जे काही पूर्वज प्रेत अवस्थेमध्ये वा कोणत्याही प्रकारच्या दुर्गतीस प्राप्त झाले असतील त्यांच्या त्या दुरावस्था व दुर्गती सदरील पितृपक्षातील शिवरात्रीच्या रुद्राभिषेकाने दूर होऊन त्यांना योग्य ती उत्तम गती प्राप्त होते त्यायोगे ते आपल्या पुढील उन्नतीस आशीर्वचन देऊन आपल्या समस्या दूर करतात. याकरिता या वेळेचे अभिषेक द्रव्य हे वरील ग्रंथाच्या मार्गदर्शनाप्रमाणे पायस म्हणजे दुध तथा तांदूळ व शर्करा मिश्रित खीर असून वरील ग्रंथात उल्लेखीत फल हे सदरील द्रव्याने रुद्रअभिषेक केला असता आपल्या पूर्वजांच्या झालेल्या दुर्गती तथा दुरवस्था यांचा नाश करून त्याद्वारे आपणास उन्नतीचे आशीर्वचन देऊन आपल्या समस्या नाश करणे हे फल आहे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: