क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले भाषण | मी सावित्रीबाई फुले बोलते | शालेय वक्तृत्व, भाषण स्पर्धा |
Автор: Khede Vidyaprasarak Mandal
Загружено: 2026-01-03
Просмотров: 225
'सावित्रीबाई फुले जयंती' व 'बालिका दिन' मोठ्या उत्साहात साजरा
खेडे: आज शनिवार, दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी गांधी ॲण्ड फुले (तांत्रिक) विद्यालय व कै. उद्यानपंडित बापूसाहेब ग. द. माळी (गुरुजी) कनिष्ठ महाविद्यालय, खेडे, ता. जि. धुळे येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९५ वी जयंती 'बालिका दिन' म्हणून अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या सोहळ्यात विद्यार्थिनींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून, गीतांच्या माध्यमातून सावित्रीबाईंच्या कार्याला वंदन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. सुरेखाताई गवते होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून दिल्ली येथे पार पडलेल्या ६८ व्या नॅशनल शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये १० मीटर पिस्तुल प्रकारात कास्यपदक पटकावून गावाचे नाव उज्ज्वल करणारी कुमारी दर्शना गवते उपस्थित होती. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या अध्यक्षा सौ एस. टी. अहिरे, संस्थेचे सचिव दादासाहेब श्री टी. एस. अहिरे, कार्याध्यक्ष एस. एस. अहिरे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तथा महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती आर. के. महाजन हे आवर्जून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने झाली. त्यानंतर पाहुण्यांचे शब्दसुमनांनी स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी विद्यार्थिनींसाठी वेशभूषा करून वक्तृत्व आणि गीत गायन या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. तीन गटांत विभागलेल्या या स्पर्धांमध्ये विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
गट क्र. १ (५ वी ते ७ वी): कु. भाग्यश्री सरदार राठोड हिने प्रथम क्रमांक, तर कु. रोशनी पिंटू बंजारा हिने द्वितीय क्रमांक पटकावला.
गट क्र. २ (८ वी ते १० वी): कु. राधिका विलास माळी हिने प्रथम, तर कु. हर्षदा नामदेव खैरनार हिने द्वितीय क्रमांक मिळवला.
गट क्र. ३ (११ वी ते १२ वी): कु. भाग्यश्री नानाभाऊ भामरे हिने प्रथम, तर कु. तेजस्वीनी राजेंद्र अमृतसागर हिने द्वितीय क्रमांक पटकावला.
गीत गायन स्पर्धेत कु. पलक कोळी आणि कु. सिमा नवसारे गट यांनी प्रत्येकी प्रथम क्रमांक मिळवून उपस्थितांची मने जिंकली.
या स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून प्राध्यापक श्री डी. पी. भदाणे, प्राध्यापक श्री बी. पी. राठोड आणि श्री पी. एल. अहिरे सर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात सौ. सुरेखाताई गवते यांनी सावित्रीबाईंच्या संघर्षाची आठवण करून देत मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी दर्शना गवते हिच्या यशाचे गमक सांगत विद्यार्थिनींना जिद्दीने प्रगती करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्रीमती आर. डी. महाजन यांनी अतिशय प्रभावीपणे करून सर्व वातावरण प्रसन्न केले होते. या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: