Jangli Jaigad ( koyna nagar, Tal- Patan)#
Автор: Durganchi Disha
Загружено: 2020-12-05
Просмотров: 7483
नमस्कार मित्रांनो,
नागाधिराज महाबळेश्वरुपी सह्याद्री आणि त्याच्या कुशीत उगम पावलेली कोयना..सुजलाम सुफलाम महाराष्ट्राच्या समृद्धीमध्ये भर घालणारी एक भाग्यरेखा आहे..या कोयनेच्या काठावर एक जैविक परिसंस्था बहरली आणि यात विविध झाडांनी, फुलांनी,फुलपाखरानी, पशु पक्षांनी आपली एक सृष्टी निर्माण केली..याच सृष्टीत निसर्गाच्या या सर्व लेकरांना विठू माऊली सारखा आपल्या अंगाखांद्यावर खेळवून त्यांचे संरक्षण करणारा किल्ला म्हणजे जंगली जयगड..शिवकाळात या गडाने स्वराज्याला पाठबळ दिलेच परंतु आजही हा रांगडा शिलेदार कोयनेचा जलविद्युत प्रकल्प आपल्या पोटात सुरक्षित ठेऊन अखंड महाराष्ट्राचा पोलादी आधारस्तंभ झाला आहे..
या गडाला भेट देण्यासाठी चिपळूण-कराड मार्गावरील कोयना नगर हे ठिकाण गाठावे लागते..इथून पुढे नवजा- ओझर्डे या मार्गाने पुढे येऊन चेक पोस्ट जवळ थांबायचे..वनविभागाची परवानगी घेऊनच आपल्याला या परिसरात फिरता येते..
दुर्गांची दिशा..
-ज्ञानेंद्र वैशाली यशवंत सरफळे
कोयना परिसरात असणारे गाईड : नितेश कांबळे (9767823130)
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: