वसईतील लग्नसोहळा - सौदीऑ | Vasai wedding - Saudio
Автор: Sunil D'Mello
Загружено: 2021-01-02
Просмотров: 85416
वसईतील लग्नसोहळे म्हणजे चार-पाच दिवस चालणारा एक उत्सवच असतो. वसईकर लग्नात विविध रीतिरिवाज असतात जे ह्या सोहळ्यात एक आगळीवेगळी रंगत आणतात.
'सौदीऑ ', नावाप्रमाणेच अगदी हटके व वसईव्यतिरिक्त इतर कुठेही न आढळणाऱ्या ह्या रिवाजाबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. लग्नाची धामधूम संपल्यावर दुसऱ्या दिवशी लग्नघरची मंडळी, जवळचे नातेवाईक व गावकरी ह्यांनी लग्नकार्य यशस्वी करण्यासाठी जी मेहनत घेतलेली असते त्याची पोचपावती म्हणून एक मासळीचे जेवण आयोजित केले जाते. शिवाय संध्याकाळी सासरी गेलेल्या आपल्या मुलीला म्हणजे नववधूला व आपल्या जावयाला म्हणजे वराला मोठ्या सन्मानाने आणि हल्ली तर अगदी बँडबाजाच्या तालावर घरी आणले जाते. ह्या मिरवणुकीला तर एखाद्या वरातीचेच रूप येते. ज्याप्रमाणे नव्या नवरीच्या हातात सौभाग्याचे प्रतीक म्हणजे हिरवे चुडे भरले जात असताना पोस्त वसूल केले जाते त्याप्रमाणेच जावई जेव्हा सासुरवाडीला पोहोचतो तेव्हा त्याच्याकडूनही हक्काने पोस्त वसूल केले जाते. ह्याप्रसंगी होणारे हास्यविनोद, शाब्दिक कोट्या व पारंपरिक गीतांची रेलचेल ह्यामुळे ह्याप्रसंगी उत्साहाला अगदी उधाण आलेले असते.
आपण अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद.
विशेष आभार: माल्कम, एलीटा व कुटुंबीय
छायाचित्रण व संकलन: अनिशा डि'मेलो
वसईतील लग्नसोहळा सर्व व्हिडिओज
• Vasai wedding वसईतील लग्नसोहळा
वसईतील लग्नसोहळा - हाऊरॉ
• वसईतील लग्नसोहळा - हाऊरॉ | Vasai wedding -...
वसईतील लग्नसोहळा - आयज
• वसईतील लग्नसोहळा - आयज | Vasai wedding - A...
वसईतील लग्नसोहळा - नावळ
• वसईतील लग्नसोहळा - नावळ | Vasai wedding - ...
#vasaiculture #vasaiwedding #sunildmello #vasaicustoms #vasaiheritage #kupariwedding #traditionalwedding #sunildmellovasai #saudio
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: