Kharosa Caves | खरोसा लेणी | Treasure of Kharosa |
Автор: Kiran Mengale
Загружено: 2021-01-31
Просмотров: 7521
Kharosa Caves | खरोसा लेणी | latur |
खरोसा हे लातूर जिल्यातील निलंगा तालुक्यातले गाव आहे. हे गाव लातूर-निलंगा रस्त्यावर लातूरपासून ४५ किमी अंतरावर आहे. गावाच्या पुढे रस्त्याला लागून असलेल्या छोट्या डोंगरावर १२ लेणी आहेत. महामार्गावरून थेट लेण्यांपर्यंत जाण्यासाठी रस्ता बनवलेला आहे.
येथे इ.स. सहाव्या शतकातील कोरीव लेणी व शैलगृहे आहेत. लातूर-बिदर रस्त्यापासून सुमारे ४ किमी अंतरावर असलेल्या टेकडीवर ही लेणी कोरलेली आहेत. येथे एकूण १२ गुंफा असून ही जांभ्या दगडांमध्ये कोरलेली आहेत. या दगडाच्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या नैसर्गिक झिजेने आणि लेण्यांबद्दल असलेल्या अनास्थेमुळे ही लेणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. लेणी अपूर्ण आहेत. सुरुवातीस बौद्ध लेणी आहेत. त्यांचे प्रवेशद्वार लोखंडी जाळीच्या दरवाजाने बंद केलेले असल्यामुळे आत जाता येत नाही. बुद्धमूर्तीच्या खाली चौथरा बांधलेला व नित्य पूजाअर्चा चालू असलेली दिसते.
#KharosaCaves
#खरोसालेणी
#latur
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: