कथा स्वर्गारोहणाची -भाग १
Автор: Vishwashanti Darshan
Загружено: 2025-10-23
Просмотров: 117
आता विश्वात्मके देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें
असं संत ज्ञानेश्वर माऊली आपल्या पसायदानात सुरवातीला म्हणतात,
शांतीपरते नाही सुख,येर अवघेचि दु:ख
म्हणूनी शांती धरा उतराल पैलतीरा...असं जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे तर विज्ञान आणि अध्यात्म एकत्रितपणे विश्वात शांती निर्माण करु शकेल असं स्वामी विवेकानंदांनी सांगितलं आहे.ही दैवी त्रिमुर्ती विश्वधर्मी प्रा.डॉ.विश्वनाथ दा.कराड सरांची स्फूर्तीस्थाने आहेत.
डॉ.संजय उपाध्ये सरांनी आदरणीय कराड सरांनी निर्माण केलेल्या या वास्तूंकडे पहात सरांचे पसायदान लिहीले.उपाध्ये सर या पसायदानात असं म्हणतात...
आता विश्वरुपे देवे । येणे वास्तुयज्ञे तोषावे। तोषोनि मज द्यावे। पसायदान हे ।।१।।आता विश्वात्मके देवें...येणे वास्तुयज्ञे तोषावे...' म्हणजेच, हे देवा, माझं हे कार्य तुझ्या आनंदासाठी असावं,जगाच्या कल्याणासाठी असावं...असंच अद्भुत कार्य शांतीचे उपासक असणारे विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड सर यांनी केलं आहे. त्यांनी जो आजवर विश्वशांतीचा वास्तुयज्ञ केला, त्यात अनेक वास्तुंच्या निर्मितींचा समावेश आहे. त्यातीलच एक म्हणजेच पांडवांचे स्वर्गारोहण .
हे जणू त्या मंदिराच्या कळसासारखं कार्य आहे. या साकारलेल्या मूर्ती म्हणजे केवळ पुतळे नाहीत,तर सत्य, धर्म आणि मानवतेचा जिवंत संदेश आहेत.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: