धाराशिवमध्ये महायुतीत मोठी फूट! भाजपला ताकद दाखवून देऊ, शिवसेनेचा इशारा | Dharashiv Politics
Автор: Saam TV News
Загружено: 2025-11-23
Просмотров: 5922
धाराशिव जिल्ह्यातील आठ नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये फूट पडल्याचे समोर आले आहे. भाजपसोबतची युती तुटल्यानंतर शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे. 'आमचे मुख्य नेते आणि पालकमंत्र्यांची भूमिका शेवटपर्यंत युती टिकवण्याची होती, पण भाजपने सन्मानजनक जागा दिल्या नाहीत', असे या मुलाखतीत स्पष्ट करण्यात आले. आता २१ जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवून १५ ते २० जागांवर विजय मिळवण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. 'या निवडणुकीत भाजपला शिवसेनेची खरी ताकद काय आहे हे कळेल', असेही म्हटले आहे. नगराध्यक्षपदासाठी कोणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असून, सध्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्यावर लक्ष केंद्रित केले जात असल्याचे सांगण्यात आले.
#Dharashiv #NagarParishadElection #Mahayuti #ShivSena #BJP #MaharashtraPolitics #LocalBodyElection #SaamTV #SaamTVNews #MarathiNews #DharashivNews #AllianceBreakup #Election2025 #PoliticalNews #BlackAndWhite #NileshKhare #Maharashtra #Politics
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: