Utha Sakal Jana Uthile Narayan | Sant Tukaram | ॥दिंडी अभंगाची॥ | Dindi Abhangachi | Aashlesha Lele
Автор: Aashlesha Lele Official
Загружено: 2020-06-02
Просмотров: 1488
कोरोनामुळे आपण सर्वजण दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ घरी आहोत. आषाढीतील वैष्णवांचा मेळा होऊ घातला आहे. शेकडो वर्षांच्या आपल्या वारीवर यंदा कोरोनाचे सावट आहे. तमाम वारकऱ्यांना पंढरीची ओढ लागली आहे. या पार्श्वभूमीवर माऊलींना नमन करून संत रचना अर्थात अभंग, निर्जला एकादशी ते आषाढी एकादशीपर्यंत ‘दिंडी अभंगाची’ च्या माध्यमातून गानसेवा करण्याचा हा माझा प्रयत्न आहे. ‘कठिण समय येता, कोण कामास येतो’...या प्रसंगात केवळ आणि केवळ संतांचे प्रेरणादायी विचार, शिकवण आपल्याला बळ देऊ शकते. वाद्य, साथसंगतीशिवाय उपलब्ध साधनांचा वापर करून केलेली माझी ही सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण..!
तरी तुम्ही सुद्धा माझ्या सोबत ह्या अभंग दिंडीत जरूर सामील होऊन संत वाङमयाचा आस्वाद घ्यावा!
राम कृष्ण हरी..🙏🙏🙏
ईश्वर भक्तीचे सर्वात सुलभ साधन म्हणजे 'नामस्मरण'. भक्तीमार्ग केवळ मनीचा शुद्ध भाव. भगवान श्रीकृष्णाने नामस्मरणाला गीतेमध्ये 'जपयज्ञ' म्हटले आहे. सर्वच संतांनी 'नाम' घेण्याचा उपदेश केला आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, प्रभाते मनी राम चिंतीत जावा... जगद्गुरू तुकाराम महाराज यांनीही एका अभंगात ईश्वर भक्तीची आठवण करून दिली आहे, राम प्रहरी उठून हरी नाम घ्यावे आणि दशदिशा भूपाळीच्या सुरांनी प्रफुल्लित होत असताना ईश्वर चरणी लीन व्हावे. ते म्हणतात..
उठा सकळजन, उठिले नारायण...
उषा मंगेशकर यांनी गायलेला एक सुंदर अभंग.
🙏राम कृष्ण हरी 🙏
#DindiAbhangachi #AashleshaLele #RamKrishnaHari #SantTukaram #TukaramGatha #VarkariSampraday #Vari #Varkari #Dindi #Mauli #VitthuMauli #VitthalRakhumai #VitthalRukmini #Aalandi #Dehu #MaharashtraParampara #Pandharpur #Pandurang #Abhang #LockdownMusic #MusicallyYours #IndianSingers #दिंडी_अभंगाची #MusicForEveryMood #MusicMyLife #SingersOfIndia #IndianClassics #AbhijaatSangeet #ashadhiekadashi #ashadhiwari
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: