Ganjrai Waterfall | Finally 100 Fort Completed | Nashik Group | Maharashtra
Автор: Panthastha
Загружено: 2025-09-11
Просмотров: 203
सन २०२१ मध्ये माझी ‘गिर्यारोहक’ नाशिक या ट्रेकिंग ग्रुपशी ओळख झाली. त्याच वेळी डॉ. मधुसूदन दातार सरांशी भेट झाली. मग काय, त्यानंतर प्रत्येक शनिवार-रविवारी त्यांच्या सोबत ट्रेकिंगला जायला लागलो आणि तिथूनच गड-किल्ल्यांची आवड निर्माण झाली. बोलता-बोलता एक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही.
दरम्यान काही दिवस माझं ट्रेकिंग थांबलं त्या नंतर मला नोकरी मिळाली आणि मी मुंबईला आलो. तरीही माझं ट्रेकिंग सुरूच होतं, पण ग्रुपपासून थोडा दूर होतो. मुंबईत मला माझ्यासारखेच भटकंती करणारे काही मित्र भेटले, मनं जुळली आणि आम्ही एक छोटासा ग्रुप तयार केला. गड-किल्ले, डोंगर वाटा असं भटकत राहिलो.
आणि एके दिवशी डॉ. मधुसूदन दातार सरांचा फोन आला. त्यांनी विचारलं, “मयुर, कसा आहेस?” हे ऐकून खूप आनंद झाला. सर म्हणाले, “आपल्या ग्रुपचे १०० गड-किल्ले पूर्ण झाले आहेत. त्या निमित्ताने आपण एक छोटा ट्रेक करणार आहोत आणि सोबत वॉटरफॉल रॅपलिंग सुद्धा करणार आहोत. तुला यायचं आहेच.”
दिवस ठरला – २४ ऑगस्ट. आम्ही वाल्हिवळे या गावी रामदास पोकळा यांच्या घरी जाणार होतो आणि तिथून गंजराई या छोट्याशा धबधब्यावर वॉटरफॉल रॅपलिंग करणार होतो. सकाळी लवकर उठून आम्ही निघालो.
मित्रांनो, काय धमाल केली आहे सगळ्यांनी! मी सर्वांचा ऋणी आहे. असंच आपण नेहमी भेटत राहू आणि नव्या गड-किल्ल्यांच्या शोधात निघत राहू
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: