Pratap Gad | प्रताप गड | Part 4 | By Unplanned Trips
Автор: Unplanned Trips
Загружено: 2024-02-09
Просмотров: 537
Pratap Gad | प्रताप गड | Part 4 | By Unplanned Trips #pratapgad
Pratap Gad | प्रताप गड | Part 4 | By Unplanned Trips
#प्रतापगड
#प्रतापगड_किल्ला
#Pratapgad
#Pratapgad_Fort
#Shivaji_Maharaj
#शेर_शिवराज
#Sher_Shivraj_Movie
#Sher_Shivraj
प्रतापगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
वाहनतळावरून गडाच्या दक्षिणेच्या टेहळणी बुरुजाखालून सरळ जाणाऱ्या पायवाटेने आपण थोड्या वेळातच तटबंदीत लपविलेल्या पश्चिमाभिमुख महादरवाज्यात येऊन पोहोचतो. वैशिष्ट्य म्हणजे शिवकालीन रितीप्रमाणे आजही हा दरवाजा सूर्यास्तानंतर बंद ठेवला जातो व सूर्योदयापूर्वी उघडला जातो. महादरवाज्यातून आत गेले की उजव्या हातालाच चिलखती बांधणीचा बुरूज दिसतो. हा बुरूज पाहून परत पायऱ्यांच्या मार्गाने भवानी मंदिराकडे जाता येते. मंदिरात भवानीमातेची सालंकृत प्रसन्न मूर्ती आहे. ही मूर्ती महराजांनी नेपाळमधील गंडकी नदीतून शाळिग्राम शिळा आणून त्यातून घडवून घेतली. या मूर्तीशेजारीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नित्य पूजेतील स्फटिकाचे शिवलिंग व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे.
ह्या मंदिरासमोरून बालेकिल्ल्याकडे चालू लागल्यास उजव्या हाताला समर्थस्थापित हनुमानाची मूर्ती दिसते; पुढे बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर आपण केदारेश्वर महादेवाच्या मंदिराजवळ येऊन पोहोचतो. मंदिरात भव्य शिवलिंग आहे. या मंदिराशेजारीच प्रशस्त सदर आहे. किल्ल्याच्या बुरुजावरून आजूबाजूला पहिले असता मोठमोठे पर्वत दिसतात. या प्रत्येक पर्वताचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे.
केदारेश्वर मंदिराच्या मागील बाजूस राजमाता जिजाबाईंच्या वाड्याचे अवशेष आहेत. येथे उजवीकडे बगीचाच्या मधोमध शिवाजीचा महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे.या पुतळ्याच्या जागीच पूर्वी राजांचा राहता वाडा होता. या पुतळ्याशेजारीच शासकीय विश्रामधाम असून येथील बागेतून उजव्या बाजूच्या वाटेने तटावर जाऊन तटबंदीवरून फेरफटका मारताना जावळी खोऱ्याचे विहंगम दृश्य दिसते. किल्ल्याला महादरवाज्याखेरीज घोरपडीचे चित्र असणारा राजपहाऱ्याचा दिंडी दरवाजा आहे. त्याच्या जवळ रेडका बुरूज, पुढे यशवंत बुरूज, तर त्याच्यापुढे सूर्य बुरूज हे बुरूज आहेत.
अफझलखानाने दगा केल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला मारले. त्यानंतर संभाजी कावजी या मर्दानी गड्याने अफझलखानाचे शिर या बुरुजात पुरले, असे इतिहास सांगतो. भवानीच्या नगरखान्याची खिडकी उघडून पाहिल्यानंतर देवीचा चेहरा दिसतो. या देवीचीही एक कथा सांगितली जाते. शिवाजी महाराजांनी या देवीसाठी रोज सनई चौघडा वाजविण्याची प्रथा सुरू केली होती. 'हडप' आडनावाचा पुजारी तिला पंचामृतासह नैवेद्य दाखवीत असे. या भवानी मंदिरात सभामंडप व नगारखाना आहे. मंदिरापासून शे-दोनशे पावले चढल्यावर एक छोटेखानी दरवाजा लागतो आणि तेथूनच किल्ल्यात प्रवेश होतो. त्याच्यापुढे एक पडीक चौथरा आहे. विमानातून प्रतापगड पाहिला तर त्याचा आकार फुलपाखरासारखा दिसतो. १४०० फूट लांबी व ४०० फूट रुंदी एवढा त्याचा विस्तार आहे. इतर गडांपेक्षा या गडाला विशेष चांगली तटबंदी आहे. वायव्येकडे तटबंदी ८०० फुटांहून अधिक उंच आहे. बालेकिल्ल्याच्या ईशान्येला किल्ल्यातल्या दोन तळी आहेत. तेथून कोयनेचे खोरे सुंदर दिसते व येथेच ही किल्ल्याची फेरी पूर्ण होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांच्या देखरेखीखाली प्रतापगडाचे बांधकाम इ.स.१६५६ पार पडलेे.
छत्रपती राजाराम महाराज गडावर एप्रिल १६८९ ते १० ऑगस्ट १६८९ पर्यंत वास्तव्यास होते. छत्रपती राजाराम महाराज यांची काकरखानासोबत पहिली लढाई याच गडाच्या पायथ्याशी झाली, त्यामध्ये नेत्रदीपक कामगिरी बजावली होती. या लढाईत पायदळ प्रमुख पिलाजी गोळे हे छत्रपतींच्या सोबत चिलखतीप्रमाणे पुढे होते.
इ.स.१६५६ ते इ.स १८१८ काही महिने सोडल्यास हा किल्ला शत्रूपासून अभेद्य राहिला.
१७ फुटाचा कांस्याच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उदघाटन इ.स. १९५७ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले.
कसे जावे?
प्रतापगडाला जाण्यासाठी जवळचे ठिकाण - महाबळेश्वर, जिल्हा सातारा.
#pratapgad
"Namaste, and welcome to Unplanned Trips - Your Window to the Wonders of India! 🇮🇳📽️
Follow -
Instagram - unplanned._trips
pratapgad,pratapgad fort,pratapgad fort history,pratapgad killa,प्रतापगड,प्रतापगड किल्ला,प्रतापगड माहिती,pratapgad mahiti,pratapgad killa video,pratapgad video,pratapgad bike ride,pratapgad road trip,pratapgad history in marathi,shivaji maharaj forts
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: