Politicalnews:जामनेर राष्ट्रवादीचे सहा नगरसेवक परत......
Автор: Voice of Chalisgaon
Загружено: 2025-11-23
Просмотров: 10626
जामनेर नगर पालिका निवडणुकीत आपल्या पक्षाचा उमेदवारांना प्रलोभने देऊन आणि धाक दाखवून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याचे कारण देत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सहा उमेदवार हे काल अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अज्ञात स्थळी रवाना झाले होते,अर्ज माघारीची मुदत संपल्यावर ते जामनेर येथे परतल्या नंतर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे.
जामनेर नगरपालिका निवडणुकीत आपल्या उमेदवाराना प्रलोभने देऊन त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याने,अर्ज माघारी दिवशी आपण पाच उमेदवारांना सुरक्षित ठिकाणी नेले होते
आपल्यावर कोण दबाव आणत आहे,हे सगळ्या जनतेला माहित आहे,मात्र त्यांचे नाव आपण आज सांगू शकत नाही,निवडणूक प्रक्रिया आटोपल्यावर ते आपण जाहीर करू,
जामनेर नगर पालिका निवडणूक ही एक हाती विजय मिळविण्या साठी भाजपा कडून हे केले जात आहे,मात्र आहे ते होऊन देणार नाही,तुम्ही मागच्या पाच वर्षात विकास कामे केली आहेत तर मग आता इतर पक्षाचे उमेदवार मागे घेण्यासाठी का प्रयत्न करावे लागत आहे,साधना महाजन महाजन यांचे नाव न घेता,त्यांचा विजय नसून ती लोकशाहीची हत्या असल्याचं सांगत,जावेद मुल्ला यांनी आपल्या राष्ट्रवादी पक्षाचे आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार हे बहुमताने निवडणुन येतील असा विश्वास व्यक्त केला आहे
आपण उमेदवारी अर्ज मागे घेण्या दिवशी अज्ञात स्थळी असताना,भाजपा च्या अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचे आपल्याला अनेक फोन आले होते,वेळ आली तर आपण त्यांची नावेही जाहीर करून अशी प्रतिक्रिया जामनेर नगरपालिका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार जावेद मुल्ला यांनी अज्ञात स्थळावरून जामनेर येतं परत आल्याच्या नंतर दिली आहे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: