फक्त तीन गोष्टींपासून मी बनवले वडे 😋😋.. सुपरटेस्टी |
Автор: aaple ghar aapla swad
Загружено: 2025-04-23
Просмотров: 41
फक्त तीन गोष्टींपासून मी बनवले वडे 😋😋.. सुपरटेस्टी |#ytvideo#vadapav#vade
साहित्य:-
१. बटाटे
२. हिरवी मिरची
३. कोथिंबीर
४. लसूण
५. आदरक
६. पुदिना
७. दही
८.तेल
९. बेसन पीठ
१०.मीठ
११. लाल तिखट
१२. हळद पावडर
कृती:-
१. बटाटे शिजवून घ्यायचे.
२.बेसन पिठाचे बॅटर बनवून घ्यायचे त्यासाठी मी इथे ३- ४ मोठे चमचे भरून बेसन पीठ घेतले आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि चिमूटभर हळद घालून मिसळून घेतले. पाणी घालून चांगले एकसंघ बॅटर बनवून घेतले.
३. वाटण काढून घ्यायचे त्यासाठी मी इथे ४ - ५हिरवी मिरची, इंचभर आदरक,९/१० लसुन पाकळ्या आणि थोडी कोथिंबीर किंवा कोथिंबिरीच्या काड्या यांचे चांगले वाटण बनवून घेतले.
४. तोपर्यंत बटाटे जर कुकर ला लावले तर लवकर शिजले जातील मग बटाटे थोडे थंड करून त्याची साल काढून घेतली.
५. एका बाजूला बटाट्याची भाजी बनवून घेऊया त्यासाठी एक 🥘 पॅन किंवा कढई घ्या त्यामध्ये दोन पळी तेल टाकले तेल गरम झाले की त्यामध्ये मोहरी आणि जिरे घालून तडतडू द्यायचे आहे मग त्यामध्ये तीन चार पाने कढीपत्ता टाका आणि जे बटाटे सोलून ठेवले ते हाताने कुस्करून टाका.
६. यामध्ये एक चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून घ्या आणि चांगले मिक्स करून घ्या. मग वरून थोडी हिरवी कोथिंबीर घालून घ्या.
७. आता आपली भाजी तयार आहे ती थंड होऊदया.
८. आता एका कढई मध्ये तेल तापत ठेवा आणि आधी जी कोवळी हिरवी मिरची बाजूला ठेवली आहे ती तळून घेऊया.
हिरवी मिरची तळताना ती स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यावी आणि तिचे पोट मध्ये फाडले की मिरची फुटून तेल अंगावर उडणार नाही.
९. बनवलेल्या बॅटर मध्ये दोन चमचे कडकडीत तापलेले तेल टाकून घेऊया त्यामुळे वडे छान क्रिस्पी बनतात.
१०. बॅटर perfect बनले आहे आता एक ते दोन वडे एकावेळी तळू शकतो.
११. वडे तेलामध्ये टाकताना विडिओ मध्ये जसे टाकले आहे त्या पद्धतीने टाका म्हणजे तेल तुमच्या अंगावर उडणार नाही.
१२. जी रेड चटणी आहे त्यासाठी आपल्याला बेसन पिठाचे छोटे छोटे बॉल्स बनवायचे आहेत आणि त्याचीच चटणी बनवायची आहे
१३. लाल चटणी बनवताना त्यामध्ये ब्रेड किंवा शेंगदाणे सुद्धा वापरू शकता. जे क्रिस्पी बॉल्स बनवले त्यामध्ये लाल तिखट आणि मीठ आणि तीन ते चार लसुन पाकळ्या घालून मिक्सर ला हलके grind करून घ्या.
१४. जर बॅटर उरलेच तर त्याचे तुम्ही कांदा भजे सुद्धा बनवू शकता.
===================================
आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.
रेसिपी नक्की करून बघा आणि चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अश्याच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत खात राहा आणि मस्त रहा. धन्यवाद 🙏 🙏
#फूड
#मराठी
#वडापावरेसिपी
#foodvideos
#aaplegharaaplaswad
#vadapav
#vadapavrecie
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: