स्थानीय निवडणुकीपूर्वी शिवसेनेत मोठा निर्णय | देण्यात आली नवी जबाबदारी
Автор: MLA Sanjay Gaikwad
Загружено: 2025-06-04
Просмотров: 987
शिवसेनेच्या बुलढाणा जिल्हा संघटकपदी आमदार धर्मवीर संजय गायकवाड यांची नियुक्ती
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाकडून राज्यभरात संघटनात्मक पुनर्रचना करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये संपर्कप्रमुख पदे रद्द करून ‘जिल्हा संघटक’ ही नवी रचना करण्यात आली आहे. या अनुषंगाने बुलढाणा जिल्हा संघटकपदी आमदार धर्मवीर संजय गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील संघटनात्मक कार्य, पक्षनिष्ठा आणि कार्यपद्धती लक्षात घेऊन पक्ष नेतृत्वाने ही मोठी जबाबदारी दिली आहे. आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्ष संघटन बळकट करण्यासाठी संजय गायकवाड हे आता जिल्हा संघटक या भूमिकेतून कार्यरत राहणार आहेत.
या नव्या रचनेनुसार, पक्षातील सर्व अंगिकृत संघटना आता जिल्हा संघटक पदाच्या माध्यमातून समन्वय साधतील. हे स्पष्ट करताना शिवसेना पक्षाचे मुख्यनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सूचित केले आहे.
नियुक्तीपत्र प्रदान करताना केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव आणि महिला संघटक सौ. ज्योतीताई वाघमारे उपस्थित होते. याच कार्यक्रमात सौ. अनुजाताई सावळे, जिजाताई राठोड यांच्यासह अनेक महिलांनी शिवसेना महिला आघाडीत प्रवेश केला.
#शिवसेना #बुलढाणा #जिल्हा_संघटक #संजय_गायकवाड #Shivsena #Buldhana #प्रतापराव_जाधव #ज्योतीताई_वाघमारे #एकनाथ_शिंदे #अनुजाताई_सावळे #जिजाताई_राठोड #ShivsenaLeadership #स्थानीय_निवडणूक
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: